शेतकऱ्यांनो, पेरणीची घाई नको ! जुलैमध्ये पाऊस पडणार, पुरेसा पाऊस होऊ द्या

पेरणीचे दिवस आलेली आहेत, त्यामुळे राज्यातील बहुतांशी शेतकरी पेरणीची घाई करताना आपल्याला दिसून येत आहेत. परंतु कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना वेळोवेळी मापक प्रमाणात पाऊस पडल्याशिवाय पेरणी करू नका, अशा सूचना दिल्या जात आहेत. मानसूनने यावर्षी ओढ दिलेला असला, तरी जुलैच्या पहिल्या आठवड्यात पावसाचा जोर पुन्हा ओसरणार असल्याची माहिती तज्ञाकडून दिली जात आहे. पहिल्या पंधरवड्यातील काही दिवस कोरडे जाण्याची शक्यता असल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीसाठी घाई करू नये.

मुबलक प्रमाणात पाऊस नसतानासुद्धा शेतकऱ्यांनी पेरणीची घाई केल्यास शेतकऱ्यांवर दुबार पेरणीच संकट ओढावू शकते, त्यामुळे पुरेसा पाऊस पडल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरण्या करु नयेत, असे आवाहन कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना पुन्हा एकदा करण्यात आलेल आहे.

शेतकऱ्यांना आता पिक विम्यासाठी फक्त 1 रुपया भरावा लागणार GR आला !

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील पीक पाण्याविषयीचा अहवाल सादर करण्यात आला. 01 ते 21 जून या कालावधीत साधारणता 16.7 मिमी पाऊस पडलेला असून हा पाऊस सरासरी पावसाच्या 145.3 मिमी म्हणजेच 11.5 टक्के इतकाच आहे.

कृषी खात्याचे आवाहन : राज्यात एक ते 21 जून या कालावधीत फक्त 16.7% पाऊस झालेला असून हा पाऊस सरासरी पावसाच्या 11.5 टक्के इतकाच आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी 80 ते 100 मिमी पाऊस झाल्याशिवाय पेरण्या करून येत असे आवाहन कृषी खात्याने शेतकऱ्यांना दिले आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची गडबड काही न करता काही काळासाठी प्रतीक्षा करून योग्य तो पाऊस पडल्यानंतर पेरणीसाठी सुरुवात करावी.

पेरणीची सद्यस्थिती : सध्यास्थितीमध्ये राज्यातील पेरणीची परिस्थिती पाहिली, तर राज्यात खरीप पिकांचे सरासरी क्षेत्र ऊस वगळता 142.40 लाख हेक्टर आहे. त्यापैकी 1.18 लाख हेक्टर क्षेत्रावर 1.39 टक्के पेरण्यात झालेल्या आहेत. त्याचप्रमाणे राज्यात खरीप पिकांचे ऊस पिकासह क्षेत्र 152.97 लाख हेक्टर असून 1.98 लाख क्षेत्रावर 1.30% पेरण्या झालेल्या आहेत.

आता शेळी-मेंढी पालनासाठी शासन 75% अनुदान देणार; पहा संपूर्ण माहिती