शेतकऱ्यांना मिळणार फक्त 1 रुपयांत पीकविमा; शासन निर्णय आला : Pik Vima Yojana in 1 Rs

Pik Vima Yojana : शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. आता शेतकऱ्यांना खरीप किंवा रब्बी पिक विमा भरताना फक्त 1 रुपये (Ek Rupayat Pik Vima) देऊन नोंदणी करावी लागणार आहे. विम्यासाठी लागणारी उर्वरित रक्कम राज्य शासनाकडून दिली जाईल. महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामार्फत घोषणा करण्यात आली होती की, शेतकऱ्यांना आता यापुढे पिक विमा योजनेचा लाभ फक्त एक रुपयांमध्ये घेता येईल.

अर्थसंकल्पामध्ये घोषणा केल्यानंतर शासनाकडून सदर योजनेचा कोणताही शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला नव्हता. परंतु काल दिनांक 23 जून 2023 रोजी या संदर्भातील महत्त्वपूर्ण शासन निर्णय शासनाकडून निर्गमित करण्यात आलेला असून शेतकऱ्यांना आता फक्त एक रुपयात पिक विमा भरता येणार आहे. सदर योजनेला सर्वसमावेशक पिक विमा योजना असं नाव देण्यात आलेल आहे. आता इथून पुढे शेतकऱ्यांना पिक विमा भरण्यासाठी येणारा खर्च द्यावा लागणार नाही, तर त्या दिवशी फक्त एक रुपये मोजावे लागतील.

नवीन १ रुपयांत पीकविमा योजना कशी असेल ?

महाराष्ट्र राज्यामध्ये पूर्वी ज्याप्रमाणे प्रधानमंत्री पिक विमा योजना राबविण्यात येत होती, त्याचप्रमाणे यापुढे ही योजना राबविण्यात येईल. यामध्ये कोणताही मोठा बदल करण्यात आलेला नाही. फक्त शेतकऱ्यांना जी खरीप हंगामासाठी 2% रब्बी हंगामासाठी 1.5% आणि रब्बी हंगामातील नगदी पिकासाठी 5% आता भरावा लागत असेल, आता तो हप्ता शेतकऱ्यांना भरण्याची आवश्यकता नाही. त्याऐवजी शेतकऱ्यांना फक्त एक रुपये भरावे लागतील, उर्वरित जो हप्ता असेल तो राज्य शासनाकडून पिकविमा कंपनीला दिला जाईल.

१ रुपयांत पीकविमा योजनेचा शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

सर्वसमावेशक पिकविमा योजना खरीप-रब्बी हंगाम 2023-24 ते 2025-26 या तीन वर्षाच्या कालावधीत Profit & Loss किंवा Cup & Cap Model नुसार राबविण्यात येईल. सदर योजनेमध्ये शेतकरी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार केंद्र शासनाचे पिकविमा पोर्टल, सामायिक सुविधा केंद्र, बँक इत्यादी माध्यमातून सहभाग नोंदवू शकतात. राज्य शासनामार्फत घेण्यात आलेला हा निर्णय शेतकऱ्यांसाठी खूपच महत्त्वपूर्ण असून गरीब व वंचित घटकातील शेतकऱ्यांना या योजनेचा मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे.

Leave a Comment