महाराष्ट्र शासनाकडून शेतकऱ्यांसाठी विविध सरकारी/शासकीय योजना राबविण्यात येतात. महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून शेती संबंधित अवजारे, यंत्रचलित आणि मानवचलीत अवजारे, बियाणे, खते इत्यादीसाठी शासनाकडून अनुदान दिलं जात.
रोटाव्हेटर अनुदान योजना महाराष्ट्र
रोटाव्हेटरसाठी ऑनलाईन अर्ज असल्यामुळे अर्जदारांना कुठेही जाण्याची आवश्यकता भासत नाही. आता शेतकऱ्यांना शेतीसाठी उपयुक्त असलेल्या रोटाव्हेटरसाठी अनुदान मिळणार आहे. संबंधित योजनेचा लाभ कसा घ्यावा, याबद्दलची सविस्तर माहिती आपण लेखांमध्ये पाहणार आहोत.
शेतकऱ्यांना रोटाव्हेटर अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम ऑनलाईन अर्ज करावा लागेल. शेतकरी स्वतःहून मोबाईलवर किंवा आपल्या जवळील आपले सरकार सेवा केंद्र, कॉमन सर्विस सेंटर या ठिकाणी जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात. अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांकडे खालीलप्रमाणे आवश्यक कागदपत्र असणे आवश्यक आहे.
- आधारकार्ड झेरॉक्स
- ७/१२, ८अ उतारा
- आधार लिंक बँक पासबुक
- मोबाईल क्रमांक
- अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकरी असल्यास वैध जातीचा दाखला
- ट्रॅक्टरचा RC बुक (निवड झाल्यानंतर)
Rotavator Subsidy Overview
कृषी यांत्रिकीकरण उपअभियान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना विविध घटकांसाठी अनुदान देण्यात येत. अनुदानाचा लाभ घेण्यासाठी संबंधितांना खालील देण्यात आलेल्या अधिकृत वेबसाइटवर ऑनलाईन अर्ज सादर करावा लागतो.
योजना नाव | कृषी यांत्रिकीकरण योजना |
लाभार्थी राज्य | महाराष्ट्र |
लाभार्थी वर्ग | महाराष्ट्रातील शेतकरी |
मिळणारा लाभ | रोटाव्हेटर खरेदीसाठी अनुदान |
अर्जाची पद्धत | ऑनलाईन |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
रोटाव्हेटरसाठी Subsidy किती ?
अनुसूचित जाती, अनुसूचीत जमाती, अल्पभूधारक आणि बहुभूधारक शेतकरी, महिला शेतकरी इत्यादी असल्यास 50 टक्के आणि इतर लाभार्थ्यांसाठी 40% खालीलप्रमाणे अनुदान मिळेल.
रोटाव्हेटर आकारमान | अनु.जाती जमाती इ. अनुदान रक्कम | इतर लाभार्थी अनुदान रक्कम |
---|---|---|
रोटाव्हेटर ५ फूट | ४२,००० रु. पर्यंत | ३४,००० रु. पर्यंत |
रोटाव्हेटर ६ फूट | ४४,८०० रु. पर्यंत | ३५,८०० रु. पर्यंत |
रोटाव्हेटर ७ फूट | ४७,६०० रु. पर्यंत | ३८,१०० रु. पर्यंत |
रोटाव्हेटर ८ फूट | ५०,४०० रु. पर्यंत | ४०,३०० रु. पर्यंत |
आँनलाईन अर्ज कसा करावा ?
- सर्वप्रथम ऑनलाईन अर्ज करण्यासाठी शासनाकडून देण्यात आलेल्या महाडीबीटी फार्मर पोर्टलला भेट द्यावी लागेल. येथे क्लिक करा
- त्यानंतर नवीन शेतकरी असल्यास नोंदणी करून अर्जदाराची संपूर्ण माहिती व्यवस्थितरित्या भरावी लागेल.
- एखाद्या शेतकऱ्यांनी पूर्वी नोंदणी केलेली असल्यास आपला युजरनेम व पासवर्ड टाकून लॉगिन करून पुढील प्रक्रिया पूर्ण करू शकतात.
- लॉगिन केल्यानंतर कृषी यांत्रिकीकरण या टॅबवर क्लिक करा.
- त्यानंतर एक नवीन पेज उघडेल, ज्यामध्ये ट्रॅक्टर अवजारे ट्रॅक्टर चालत हा पर्याय निवडून तुमच्या सोयीनुसार अर्ज करता येईल.
- अर्ज करताना अर्जदारांनी आपल्या आवश्यकतेप्रमाणे रोटावेटर आकार निवडावा, जश्याप्रकारे 5 फूट, 6 फूट, 7 फूट, 8 फूट इत्यादी
- त्यानंतर अर्जदारांनी अंतिम अर्ज दाखल करून आपल्या अर्जाची प्रत काढून ठेवावी.
- लॉटरी लागल्यानंतर पुढील प्रक्रिया कृषी सहाय्यक व कृषी अधिकारी यांच्यामार्फत पूर्ण करून संबंधित लाभार्थ्यांना त्यांच्या आधारसंलग्न बँक खात्यात अनुदान वितरित करण्यात येईल.
⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️