मित्रांनो, तुमच्याकडे जर शेती असेल, तर तुम्हाला नक्कीच शेतीबद्दलची भाव-भावकीतील वाद माहिती असतील. कट्टा कोरल्याच्या कारणावरून, जमीन कमी-जास्त असल्याच्या कारणावरून, सामायिक बांधाच्या कारणावरून, वडिलोपार्जित जमिनीच्या वाटणीवरून शेतकऱ्यांमध्ये सतत वाद निर्माण होत असतात.
Salokha Yojana Maharashtra 2023
वरील सर्व बाबींचा विचार करून शेतकऱ्यांमधील शेतजमिनीचे वाद कायमस्वरूपी मिटावेत या अनुषंगाने शासनमार्फत सलोखा योजना (Salokha Yojana) सुरू करण्यात आलेली आहे.
शेतजमिनीच्या ताब्यावरून आपापसातील वाद मिटवण्यासाठी व शेतकऱ्यांमध्ये परत सलोखा निर्माण करण्यासाठी राज्यसरकारने सलोखा या योजनेस मंजुरी दिली आहे. मागील वर्षी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये या योजनेसंदर्भातील चर्चा व मंजुरी देण्याचा निर्णय अंतिम करण्यात आला होता.
अटी व शर्ती काय असतील ?
- सलोखा योजनेचा कालावधी 2 वर्षाचा असणार आहे; त्यामुळे शेतकऱ्यांचा शेतजमिनी संदर्भातील ज्या काही अडचणी असतील, त्या विहित कालावधीमध्ये शासनाकडे अर्ज करून सोडवून घ्याव्या लागतील.
- शेतजमिनीच्या ताब्याचा कालावधी कमीत कमी 12 वर्षापासून असला पाहिजे.
- परस्परांकडे जमिनीचा मालकी हक्क व ताबा असल्याबाबतचा शासकीय पुरावा असावा, जसे मंडळ अधिकारी यांचा पंचनामा अथवा तलाठ्यांच्या नोंदवहीत नोंद इत्यादी आवश्यक.
सलोखा योजनेचा फायदा कोणाला होणार ?
Salokha Yojana महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांचा विचार करून सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल; त्याचप्रमाणे शेतीसंदर्भातील विविध न्यायालयातील प्रकरणे निकाली लागतील. जमिनीवर जबरदस्ती कब्जा होणार नाही. शेतकऱ्यांची वर्षानुवर्ष चालत असलेले जमिनीच्या ताब्यासंदर्भातील, वहिवाटीबद्दलचे वाद मिटण्यास या योजनेमुळे फायदा होणार आहे.
📣 हे सुध्दा वाचा : शेतकऱ्यांना मोफत तळ्यातील माती मिळणार !
या योजनेअंतर्गत एका शेतकऱ्यांच्या नावावरील शेतजमिनीचा ताबा दुसऱ्या शेतकऱ्यांच्या नावावर व दुसऱ्या शेतकऱ्यांच्या नावावरील शेतजमिनीचा ताबा पहिल्या शेतकऱ्यांच्या नावावर असेल, तर अशा दोन्ही जमीनधारक शेतकऱ्यांना शासनाच्या या सलोखा योजनेच्या माध्यमातून एकदम कमी खर्चात जमीनी आपापल्या नावावर करता येतील व सहसंबंध कायमस्वरूपी चांगले ठेवता येतील.
खर्च किती येणार ?
सलोखा योजनाअंतर्गत एका शेतकऱ्याच्या नावावरील शेतजमिनीचा ताबा दुसऱ्या शेतकऱ्यांच्या नावावर व दुसऱ्या शेतकऱ्यांच्या नावावरील शेतजमिनीचा ताबा पहिल्या शेतकऱ्यांच्या नावावर करण्यासाठी जमीनधारकांच्या कागदपत्रांमध्ये अदलाबदली करावी लागेल, त्यासाठी शासनाकडून मुद्रांक शुल्क 1,000 रुपये व नोंदणी शुल्क 1,000 रुपये असा एकंदरीत फक्त 2,000 रुपयाचा खर्च शेतकऱ्यांना करावा लागणार आहे.
अर्ज कसा करावा ?
सलोखा योजनेचा लाभ मिळवण्यासाठी दोन्ही पक्षकारांना म्हणजेच शेतजमिनीचा ताबा एकमेकांकडे असलेल्या शेतकऱ्यांना पंचनामा प्रमाणपत्रासाठी तलाठी यांच्याकडे अर्ज करावा लागेल. अर्जामध्ये दोन्ही सर्वे क्रमांक, गट क्रमांक, आजूबाजूच्या चतुरसीमा इत्यादीचा उल्लेख करावा. जमीनधारकांच्या आदलाबदल दस्तांसाठी दोन्ही शेतकऱ्यांपैकी कोणत्याही एका शेतकऱ्यांनी अर्जावर सही करावी.
Salokha Yojana GR Maharashtra | येथे पहा |
Join What’s App Group | येथे जॉईन करा |
सलोखा योजनेसाठी अर्ज कोणाकडे करावा ?
सलोखा योजनेअंतर्गत सदर गावातील तलाठी यांच्याकडे अर्ज करावा लागेल.
सलोखा योजनेची मुख्य अट काय ?
सलोखा योजनामध्ये पहिल्या शेतकऱ्याचा ताबा दुसऱ्या शेतकऱ्याच्या शेतजमिनीवर व दुसऱ्या शेतकऱ्याचा ताबा पहिल्या शेतकऱ्याच्या शेतजमिनीवर कमीत-कमी 12 वर्षासाठी असावा.
सलोखा योजनेअंतर्गत जमीन हस्तांतरण म्हणजेच दस्त अदलाबदलीसाठी किती शुल्क आकारण्यात येईल ?
Salokha Yojana शासन निर्णयामध्ये (GR) दिल्याप्रमाणे दस्त आदलाबदलीसाठी मुद्राक 1,000 रु. व नोंदणी शुल्क 1000 रु. असे एकंदरीत 2,000 रु. शुल्क आकारण्यात येईल.