घरासाठी अर्ज केला आहे का? PM आवास योजनेत मंजुरी मिळाली की नाही ते अशा प्रकारे तपासा !

प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण ही केंद्र सरकारची एक लोकहिताची योजना आहे, जी ग्रामीण भागातील बेघर किंवा कच्च्या घरात राहणाऱ्या गरीब कुटुंबांना पक्कं घर उभारण्यासाठी आर्थिक मदत उपलब्ध करून देते. या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती, जमाती, व अन्य आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना प्राधान्य दिलं जातं. लाभ घेण्यासाठी अर्जदाराने शासनाने ठरवलेली उत्पन्न मर्यादा आणि इतर पात्रता अटी पूर्ण केलेल्या असाव्यात.

अधिकृत माहितीच्या अनुसार, आतापर्यंत या योजनेतून सुमारे 92.61 लाख घरांचे बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे. ही योजना ग्रामीण तसेच शहरी भागातील पात्र लाभार्थ्यांसाठी उपलब्ध असून, अर्जदाराकडे स्वतःच्या नावे पक्के घर नसणे हा एक पात्रतेचा महत्त्वपूर्ण निकष आहे.

नोंदणीसाठी अंतिम मुदत आता डिसेंबर 2025 पर्यंत वाढवण्यात आली आहे. जर तुम्ही अलीकडेच या योजनेसाठी अर्ज केला असेल आणि तुमचं नाव लाभार्थी यादीत समाविष्ट आहे की नाही, हे जाणून घ्यायचं असेल, तर ते ऑनलाइन माध्यमातून सहजपणे तपासता येऊ शकतं. त्यासाठी खालील स्टेप्सचा काळजीपूर्वक वाचून घ्या.

PM आवास योजनेचा स्टेटस कसा तपासावा ? (Assessment नंबरशिवाय)

जर तुमच्याकडे Assessment नंबर उपलब्ध नसेल, तरीही तुम्ही तुमचा PMAY स्टेटस ऑनलाइन पद्धतीने सहज तपासू शकता. त्यासाठी खालील देण्यात आलेल्या स्टेप्सचा अवलंब करा.

  • सर्वप्रथम PMAY ची अधिकृत वेबसाईट उघडा. येथे क्लिक करा
  • त्यानंतर Menu > Citizen Assessment या पर्यायावर क्लिक करा.
  • पुढे Search by Name आणि Mobile No. असे दोन पर्याय दिसतील.
  • Search by Name हा पर्याय निवडात्यानंतर आपली माहिती भरावी.
    • राज्य
    • जिल्हा.
    • शहर
    • अर्जदाराचे नाव
    • वडिलांचे नाव
    • मोबाईल नंबर
  • सर्व माहिती भरल्यानंतर Submit बटणावर क्लिक करात्यानंतर स्क्रीनवर तुमचा स्टेटस दिसेल.

Assessment नंबर असल्यास स्टेटस कसा तपासावा ?

  • सर्वप्रथम Website वरील Citizen Assessment विभागात जा.
  • Assessment ID पर्याय निवडा.
  • तुमचा Assessment नंबर आणि मोबाईल नंबर टाका.
  • Submit बटणावर क्लिक करा.
  • तुमच्या अर्जाची स्थिती (Status) स्क्रीनवर दिसेल – मंजूर झाला आहे की नाही, याची माहिती मिळेल.

वरीलप्रमाणे जर तुमच्याकडे Assessment नंबर असेल किंवा नसेल अशा दोन्ही परिस्थितीत तुम्ही तुमच्या सध्याच्या घरकुल मंजुरीची स्थिती तपासू शकता.