(ऑनलाईन अर्ज सुरु) गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना | Galmukt Dharan Galyukt Shivar Yojana Maharashtra 2023

शेतकरी मित्रांनो, शासनामार्फत शेतकऱ्यांसाठी तळा-गाळापासून उच्चस्तरापर्यंत विविध अशा योजना राबविण्यात येतात. आज आपण गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार या पुन्हा सुरू करण्यात आलेल्या योजनेबद्दलची सविस्तर माहिती पाहणार आहोत.

गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना (Galmukt Dharan Galyukt Shivar Yojana

शेतीसाठी अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणजे माती. जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी जमिनीमध्ये धरणातील साठलेली गाळ शेतजमिनीमध्ये टाकून जमिनीची सुपीकता वाढवता यावी, यासाठी राज्यशासनामार्फत गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार ही योजना 6 मे 2017 रोजी शासनामार्फत सुरू करण्यात आली.

योजनेचे नावगाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार (मागेल त्याला गाळ)
विभागजलसंधारण विभाग
लाभार्थी वर्गशेतकरी
लाभ प्रकारतलाव, धरणातील काळी माती, गाळ
अधिकृत वेबसाईटhttps://wcdmh.mahaonline.gov.in/

गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार ही योजना मार्च 2019 ला संपलेली होती; परंतु सदर योजना परत नव्याने नव्या स्वरूपात शेतकऱ्यांसाठी राबविण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. त्याअनुषंगाने 16 जानेवारी 2023 रोजी ही योजना परत नव्याने राबविण्यासाठी शासनामार्फत एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आला.

योजना कोणासाठी फायदेशीर ?

एखाद्या शेतकऱ्याकडे कमी प्रमाणात शेती असेल व त्यामध्येसुद्धा जमीन खडकाळ किंवा पडीक असेल, तर अशा शेतकऱ्यांना त्याठिकाणी चांगले उत्पन्न किंवा पीक घेऊन मोठ्या प्रमाणावर उत्पन्न मिळवता येत नाही, तर अशा शेतकऱ्यांसाठी शासनाच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेली गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार ही योजना खूपच फायदेशीर ठरणार आहे.

Galmukt Dharan Galyukt Shivar Yojana का राबविण्यात आली ?

आपल्या राज्यामध्ये सर्वात जास्त धरणे व जलसाठे उपलब्ध आहेत. खेड्यापाड्यातील धरणामध्ये, तळ्यामध्ये पाण्याच्या निचरणाने मोठ्या प्रमाणावर गाळ साठलेली असते, गाळ साठल्यामुळे अशा धरणामध्ये पाणी साठवून ठेवण्याची क्षमता कमी होते; परिणामी उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये बरीच धरणे कोरडी पडतात.

हा विचार करता शासनामार्फत Galmukt Dharan Galyukt Shivar Yojana सुरू करण्यात आली. ज्याचा फायदा असा होईल की, धरणामध्ये साठलेला गाळ शेतामध्ये टाकल्यास धरणातील पाणी साठवण्याची क्षमता वाढेल व सोबतच गाळ जमिनीमध्ये टाकल्यामुळे जमिनीची सुपीकतासुद्धा वाढेल.

गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेचा फायदा

या योजनेचा फायदा सामान्यतः जनसामान्य नागरिकांना त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना देखील होणार आहे.

  • धरण, तलाव इत्यादी जलाशयातील पाण्याचा साठा वाढणार.
  • धरणातील पाण्याचा साठा मुबलक प्रमाणात झाल्यास त्याचा फायदा शेतकऱ्यांना शेतीसाठी तर जनसामान्य नागरिकांना दैनंदिन वापरासाठी होईल.
  • धरणातील गाळ शेतकरी आपल्या शेतात टाकल्यास जमीन सुपीक होईल व शेतकऱ्यांना भरघोस उत्पन्न घेता येईल.
  • सुपीक काळात जमिनीमुळे शेतकऱ्यांचा खतावर होणारा अधिकचा खर्च टळेल.
  • जमिनीला योग्य ती सुपीक गाळ व पाणी उपलब्ध झाल्यामुळे जनावरांचे पालनपोषण, चारा, भाजीपाला अशा विविध जोडव्यवसाय शेतकऱ्याला भेटतील.

Galmukt Dharan Galyukt Shivar महत्त्वाची पॉईंट्स

  • या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना जवळील धरण, तलाव यामधील गाळ मोफत उपलब्ध करून दिला जाईल. यासाठी कोणताही शुल्क आकारला जाणार नाही; परंतु गाळ वाहतुकीसाठीचा खर्च शेतकऱ्यांना स्वतः करावा लागणार आहे.
  • संपूर्ण कामाची दररोज Geo Tagging केली जाईल.
  • या योजनेअंतर्गत वाळू उपसा करता येणार नाही, यासाठीचे निर्बंध आहेत.
  • 250 हेक्टरपेक्षा कमी क्षेत्र व कमीत कमी 5 वर्षाखालील तलाव, धरणातील गाळ या योजनेअंतर्गत काढली जाणार आहे.

गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजनेसाठी अर्ज कसा करावा? Online Application for Galmukt Dharan Galyukt Shivar Yojana

शेतकऱ्यांना गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार या योजनेअंतर्गत ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा झाल्यास शेतकऱ्यांना तहसील कार्यालयाअंतर्गत ग्रामपंचायत अन्वय अर्ज करावा लागेल.

📣 शबरी घरकुल योजना संपूर्ण माहिती पहा !

ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी जलसंधारण विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर संपूर्ण माहिती व कागदपत्रासह ऑनलाइन अर्ज शेतकऱ्यांना सादर करावा लागेल. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सदरची लिंक खालील रखनामध्ये देण्यात आली आहे.

ऑनलाईन अर्जयेथे करा
नवीन शासन निर्णययेथे पहा
व्हॉट्सॲप ग्रुपजॉईन करा

गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार (मागेल त्याला गाळ) ही योजना नेमकी काय आहे ?

शासनाच्या जलसंधारण विभागामार्फत राबविण्यात येणारी मागील त्याला गाळ योजना ही शेतकऱ्यांना जवळील धरण,तलाव इत्यादी मधील काळी माती गाळ शेतकऱ्यांच्या शेतामध्ये टाकण्यासाठी मोफत अनुदान देणारी योजना आहे.

मागेल त्याला गाळ या योजनेसाठी अर्ज कसा करावा ?

या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करता येतो. त्याबद्दलची सविस्तर माहिती आपल्या लेखांमध्ये देण्यात आली आहे.

मागेल त्याला गाळ योजना कोणत्या राज्यासाठी लागू आहे ?

मागेल त्याला गाळ योजना फक्त महाराष्ट्र राज्यासाठी लागू आहे.

गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार ही योजना किती वर्षासाठी चालू असेल ?

Galmukt Dharan Galyukt Shivar Yojana ही योजना पुढील 03 वर्षासाठी म्हणजेच 2023 ते 2026 पर्यंत राबविली जाईल.

Leave a Comment