PM Kisan Yojana : पीएम किसान 14 वा हप्ता आला नाही चिंता करू नका ! 7 ते 15 ऑगस्ट दरम्यान विशेष मोहीम

PM Kisan Yojana : केंद्रशासनाकडून राबविण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 14वा हप्ता 27 जुलै 2023 रोजी पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वितरित करण्यात आला. यामध्ये राज्यातील एकूण 117.61 लाख नोंदणीकृत लाभार्थ्यांपैकी 97.99 लाख लाभार्थी शेतकरी पात्र आहेत. ज्यामध्ये राज्यातील 85.66 लाख लाभार्थ्यांनी PM किसान योजनेच्या 14व्या हफ्त्याचा लाभ घेतला असून 12.33 लाख पात्र लाभार्थी काही अटी व शर्ती अभावी या लाभापासून वंचित राहिले आहेत.

Ration Card Pdf Maharashtra

या रेशनकार्डवर कुटुंबातील संपूर्ण व्यक्तींची वैयक्तिक व इतर माहिती उपलब्ध असणार आहे, त्यावर प्रत्येकांचा आधार नंबर ही नोंदविला जाईल. त्याचप्रमाणे त्याकार्डवर डिजिटल स्वाक्षरीसह किंवा क्यूआर कोडसुद्धा उपलब्ध असेल. या नवीन रेशन कार्डमध्ये कुठल्या प्रकारच्या नोंदी आहेत, किती किलोचा कोटा ग्राहकाला मंजूर झाला आहे, इत्यादी संपूर्ण माहिती रास्तभाव दुकानदाराला सहज मिळवता येणार आहे.

एकंदरीत डिजिटल धोरणांचा सर्वांनाच फायदा होणार असून या डिजिटल रेशनकार्डची अंमलबजावणी संपूर्ण राज्यभरात लवकरच सुरू करण्यात येईल. प्रायोगिक तत्त्वावर काही जिल्ह्यांमध्ये अद्यावत रेशनकार्ड वाटप करण्यात आलेले आहेत. त्यामुळे लवकरच सर्व रेशनकार्ड धारकांना या नवीन कार्डच वाटप केलं जाईल. सोबतच त्यांना रेशनकार्ड पीडीएफ त्यांच्या मोबाईलमध्ये साठवून ठेवता येईल.

नवीन ग्राहकांना मिळणार रेशनकार्ड

ई-रेशनकार्डची योजना 1 ऑगस्टपासून लागू करण्यात आलेली असून यामध्ये सुरुवातीला नवीन कुटुंबाच्या नोंदी करणाऱ्या ग्राहकाला जुना रेशनकार्ड न देता ई-रेशनकार्ड दिला जाणार आहे. त्यावर 12 अंकी नंबर असेल आणि शासकीय शिक्कासुध्दा असेल. एकूणच ई-रेशनकार्डची संकल्पना खूपच चांगली असून याचा सर्वांना नक्कीच लाभ होणार आहे.

ई-रेशनकार्ड कधीपासून मिळणार?

1 ऑगस्ट पासून सदर योजनेची अंमलबजावणी करण्याच्या सूचना संबंधित पुरवठा विभागाला देण्यात आलेल्या असून ऑनलाईन रेशनकार्डची पीडीएफ ग्राहकांना सहज उपलब्ध होणार आहे. यावर कुटुंबातील संपूर्ण सदस्यांची नावं, संपूर्ण माहिती उपलब्ध असेल, ज्यामुळे शिधावाटप सोयीस्कर होईल.

सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील ई-रेशनकार्ड नवीन संकल्पना सुरू करण्यात येत आहे, यावरूनच शिधापत्रिकाधारक ग्राहकांना धान्य मिळेल. नाव नोंदविणे, कमी करणे, धान्य मिळविणे या सर्व प्रक्रिया रेशन कार्डधारकांना आता सहज व सोप्या पद्धतीने पूर्ण करता येणार आहे. तूर्त नवीन रेशनकार्ड धारकांसाठी ही योजना राबविली जात आहे, अशी माहिती विविध जिल्ह्याच्या पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनमार्फत देण्यात आली.

पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी केंद्रशासनाकडून अनिवार्य करण्यात आलेल्या काही अटी ज्यामध्ये भूमी अभिलेख नोंदी अद्यावत करणे, बँक खात्याला आधार लिंक करणे इत्यादी विविध बाबींचा समावेश आहे. या बाबींची पूर्तता केलेल्या राज्यातील 85.66 लाख शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेच्या चौदाव्या हप्तेचा लाभ देण्यात आलेला असून 12.33 लाख पात्र लाभार्थी या योजनेपासून वंचित राहिले आहेत.

💁 हे पण वाचा : आधारकार्ड काढून 10 वर्षे झाली ? मग हे काम नक्की करा !

पीएम किसान योजनेचा लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना ई-केवायसी त्याचप्रमाणे बँक खात्याला आधार सलग्न करणे अश्या बाबी शेतकऱ्यांनी स्वतः करावयाच्या असल्या, तरी शेतकऱ्यांच्या दैनंदिन अडचणी, गावात उपलब्ध नसलेले सीएससी केंद्र, मनुष्यबळ, पायाभूत सुविधा इत्यादी विविध बाबीमुळे या अटीची पूर्तता करण्यास शेतकऱ्यांना अडचण निर्माण होते. या सर्व गोष्टीचा विचार करून राज्यशासनाकडून आता एक नवीन पाऊल उचलण्यात आलेलं आहे.

वरील सर्व बाबींचा विचार करता पीएम किसान योजनेचा ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात येणारा 15वा हप्ता सर्व शेतकऱ्यांना मिळावा, यासाठी राज्यात 07 ते 15 ऑगस्ट यादरम्यान विशेष मोहीम राबविण्यात येणार असून याअंतर्गत भुमिअभिलेख नोंदी अद्यावत करणे, ई-केवायसी करणे, बँकेला आधार सलग्न करणे इत्यादी बाबींचा समावेश असेल. राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी संबंधित विभागाला या बाबीच्या पूर्तता करण्याचे निर्देश दिलेले आहेत तथा पीएम किसान योजनेचे राज्यस्तरीय अंमलबजावणी प्रमुख कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना ही मोहीम बंधनकारक पद्धतीने राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत.

राज्यात 7 ते 15 ऑगस्ट या कालावधीत विशेष मोहिमेसाठी तालुकास्तरावर तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी, भूमीअभिलेख विभागातील अधिकारी इत्यादींमार्फत मोहीम दिलेल्या कालावधीत प्रलंबित पूर्तता होईल, याकडे लक्ष घालण्याची आणि दैनंदिन माहिती अहवाल सादर करण्याची सूचना कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी दिली आहे.

6 thoughts on “PM Kisan Yojana : पीएम किसान 14 वा हप्ता आला नाही चिंता करू नका ! 7 ते 15 ऑगस्ट दरम्यान विशेष मोहीम”

  1. वेबसाईटवर जाऊन काय त्रुटी आहे बघा ! KYC, बँक खात्याला आधार लिंक आहे का बघा.. Land Seeding आहे का बघा…

  2. Status पहा सर, नाहीतर बँक खात्याला आधार लिंक, land seeding, kyc या सर्व गोष्टी तपासून पहा

  3. पी एम किसान 14 वा हप्ता आला नाही माझे सर्व रेकॉर्ड बरोबर आहे

  4. तहसील कार्यालयात तलाठी यांना संपर्क साधून Physical फॉर्म भरून द्या..

Leave a Comment