Aadhaar Update : तुमचा आधारकार्ड काढून 10 वर्ष पूर्ण झाली का; मग हे काम नक्की करा

Aadhaar Update : मित्रांनो, सध्याच्या स्थितीमध्ये जनसामान्य व्यक्तीचा ओळखीचा पुरावा म्हणजे आधारकार्ड होय. केंद्रसरकारच्या युआयडीएआय म्हणजेच युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियामार्फत प्रत्येक व्यक्तीसाठी एक ओळखपत्र देण्यात आलेला आहे, त्यालाच आपण आधारकार्ड म्हणून ओळखतो.

आधारकार्ड काढण्याची सुरुवात होऊन जवळपास 12 वर्षे पूर्ण झालेली आहेत. युआयडीएआयच्या नवीन नियमानुसार ज्यांचा आधारकार्ड काढून 10 वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला असेल; त्यांनी 10 वर्षानंतर आधारकार्डमध्ये बदल करणे म्हणजेच अपडेट करणे आवश्यक आहे.

Aadhar Update Mandatory After 10 Years : आधारकार्ड ओळखीचा पुरावा म्हणून त्याचप्रमाणे पत्त्याचा पुरावा म्हणून ओळखला जातो; मात्र ज्यांना आधारकार्ड काढून 10 वर्षे झाली असतील. त्यांचा पत्ता बदलण्याची शक्यता असते, त्यामुळे प्रत्येक नागरिकांनी आपला आधारकार्ड जवळच्या आधार केंद्रामध्ये पुन्हा एकदा सादर करून अपडेट करणे आवश्यक आहे.

तुम्ही आधारकार्ड काढून जर दहा वर्षे झाले असतील व या कालावधी दरम्यान आधार कार्डवरील कोणतीही माहिती तुम्ही अद्यावत केलेली नसेल, तर अशा सर्व आधारकार्ड धारकांनी आपला आधारकार्ड अपडेट करून घेणे आवश्यक आहे. ज्या व्यक्तींनी आपला आधारकार्ड अपडेट केलेला असेल म्हणजेच आधारवरील नावामध्ये, जन्मतारखेमध्ये अथवा आपल्या बोटांची ठसे अपडेट केलेले असतील त्यांच्यासाठी ही प्रक्रिया अनिवार्य नाही.

आधार अपडेटसाठी कोणती कागदपत्र लागतील ? येथे क्लिक करून पहा !

मोबाईल क्रमांक, बोटाचे ठसे अपडेट करणे आवश्यक : ज्यांनी दहा वर्षांपूर्वी आधारकार्ड काढलेले असेल, अशा व्यक्तींना त्यांचा चालू पत्ता, मोबाईल क्रमांक त्याचप्रमाणे बोटाचे ठसे बदललेली असतात, अशा व्यक्तींना या गोष्टीं अपडेट करून घ्यायच्या आहेत.

Child Aadhar Update : शून्य ते पाच वर्षाच्या लहान मुलांचे सुद्धा आधारकार्ड काढता येते. लहान मुलाचा आधारकार्ड काढताना त्यांच्या आई किंवा वडिलांचे आधार प्रमाणीकरण केले जाते; म्हणजेच आधारकार्ड काढण्यासाठी आई किंवा वडिलांच्या हातांचे ठसे घेतले जातात, त्यामुळे लहान मुलांचे सुद्धा पाच वर्षानंतर हातचे ठसे देऊन आधारकार्ड अपडेट करणे आवश्यक आहे.

Leave a Comment