शेतकऱ्यांना आनंदाची बातमी ! या 26 जिल्ह्यात नुकसान भरपाई वाटप, शासन निर्णय (GR) आला !

राज्यात सन 2020 ते 2022 या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या व इतर मालमत्तेच्या नुकसानी कोटी बाधित शेतकऱ्यांना आर्थिक मदत वाटप करण्यासाठी निधी वितरित करण्यास शासनाकडून मान्यता देण्यात आलेली असून यासंदर्भातील माहितीपूर्ण शुध्दीपत्रक दिनांक 27 मार्च 2024 रोजी शासनाकडून निर्गमित करण्यात आलेला आहे.

नुकसान भरपाई वाटप

सन 2020 ते 2022 या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या शेतपिकांच्या व इतर मालमत्तेच्या नुकसानी करिता बाधित शेतकऱ्यांना मदत वाटप करण्यासाठी सम क्रमांकाच्या दि. 22.02.2024 च्या शासन निर्णयान्वये निधी वितरित करण्यास मान्यता दिलेली एकूण रक्कम रु. 10664.94 ऐवजी रु. 11239.21 इतकी वाचावी. सुधारित प्रपत्र सोबत जोडले आहे.

उपलब्ध शुद्धिपत्रकानुसार नुकसान भरपाई वाटपाच्या निधीमध्ये महत्त्वपूर्ण बदल करण्यात आलेला असून शासन निर्णयामध्ये देण्यात आलेल्या जिल्ह्यातील विविध महसूल मंडळासाठी ही निधी वाटप केली जाणार आहे. सन 2000 ते 2003 या कालावधीत झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीसाठी लवकरच शासनाकडून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा करण्यात येईल.

Leave a Comment