Namo Shetkari Yojana : नमो शेतकरी महासन्मान योजनेसाठी शासनाकडून 1720 कोटी रु. मजूर, हफ्ता लवकरच येणार GR पहा

Namo Shetkari Yojana : ज्या योजनेची संपूर्ण महाराष्ट्रभरातील शेतकरी मोठ्या आतुरतेने वाट पाहत आहेत. त्या योजनेसंदर्भात एक महत्त्वपूर्ण अपडेट समोर आला आहे. राज्य सरकारकडून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पहिल्या टप्प्यासाठी किंवा पहिल्या हप्तासाठी निधी वाटप करण्यास मान्यता देण्यात आलेली असून शासनाकडून 1720 कोटी इतकी रक्कम मंजूर करण्यात आली आहे. यासंदर्भातील महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला असून, त्याबद्दलची थोडक्यात माहिती आपण सदर लेखाच्या माध्यमातून पाहूयात.

नमो शेतकरी योजना शासन निर्णय (GR)

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर सुरू करण्यात आलेली नमो शेतकरी महासन्मान निधी योजना बऱ्याच दिवसापासून रखडली होती. राज्यातील शेतकरी वाट पाहत होते की, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता केव्हा येणार? तर आता शासनाकडून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पहिल्या हप्त्यासाठी क्लीन चीट देण्यात आलेली असून पहिल्या हप्त्यासाठी 1,720 कोटी रुपयांच्या वाटपाला मान्यतासुध्दा देण्यात आलेली आहे.

2023-24 च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये अर्थमंत्री तथा तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामार्फत नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची घोषणा करण्यात आली. त्यानंतर जून 2023 मध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची अंमलबजावणी करून संबंधित विभागाकडून परवानगी देण्यात आली. ज्यामध्ये अतिरिक्त 100 कोटी रुपये खर्च झाले. त्यानुसार ही योजना लवकरच सुरू होईल अशी माहिती शासनाकडून देण्यात आलेली होती.

योजना नावनमो शेतकरी महासन्मान निधी योजना
विभागकृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय व मत्स्यव्यवसाय विभाग
लाभार्थीमहाराष्ट्रातील अल्पभूधारक शेतकरी
लाभ रक्कमवार्षिक 6,000 रु. लाभ
लाभार्थी संख्या80 लाख 20 हजार शेतकरी

नमो शेतकरी योजना पहिला हप्ता

बहुतांश शेतकऱ्यांकडून विचारला जाणारा पहिला प्रश्न म्हणजे नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता कधी मिळणार ? तर आता हा प्रश्न मार्गी लागलेला असून शासनाकडून एप्रिल ते जुलै 2023 च्या पहिल्या टप्प्यासाठी 1,720 कोटी रुपयांचं वाटपास मंजुरी देण्यात आलेली असल्यामुळे लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीएफएमएस प्रणालीच्या अंतर्गत डायरेक्ट खात्यात निधी वितरित करण्यात येईल.

📚 शेतकऱ्यांना पीकविमा दिवाळीपूर्वीच मिळणार ! फक्त याच शेतकऱ्यांना लाभ

नमो शेतकरी महासन्मान निधी योजना मॉडेलच्या विकासावर संपूर्णता काम चालू असून काम पूर्ण झाल्यानंतर लवकरच तांत्रिक औपचारिकता पूर्ण करून शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम वितरित करण्यात येईल, अशी माहिती नवनिर्वाचित कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्यामार्फत देण्यात आली.

शेतकऱ्यांना वर्षाला 12 हजार रु.

शासनाच्या या निर्णयामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आता केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत वर्षाला सहा हजार रुपये आणि राज्य शासनाच्या नमो शेतकरी महासंघ निधी योजनेअंतर्गत सहा हजार रुपये असे एकूण वार्षिक 12 हजार रुपये शेतकऱ्यांना मिळणार आहेत. आता नमो शेतकरी महासंबंधी योजनेअंतर्गत 1720 कोटी रुपयांचा पहिला हप्ता वितरित करण्यासाठी शासनाकडून 10 ऑक्टोबर 2023 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला असल्यामुळे लवकरच शेतकऱ्यांना आता वार्षिक 12 हजार रुपये मिळतील.

👇👇👇👇👇👇👇👇

📣 नमो शेतकरी योजना 1720 कोटी रु. वाटप शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment