पीक विमा दिवाळीपूर्वीच मिळणार; परंतु फक्त याच शेतकऱ्यांना लाभ | Crop Insurance 2023

Crop Insurance 2023 : यंदाच्या वर्षी शासनाकडून 1 रुपयात सर्व समावेशक पिक विमा योजना सुरू करण्यात आली. राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी या योजनेचा मोठ्या प्रमाणावर फायदा घेतला; शासनाकडून पीक विम्याची रक्कम तर कमी करण्यात आली, मात्र निसर्गाकडून शेतकऱ्याला साथ मिळाली नाही. आता पिक विमा काढलेल्या सर्व शेतकऱ्यांना पावसाचा खंड पडल्यामुळे त्यावर काही मिळणार आहे.

पिकविमा कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार ?

यावर्षी सततचा पावसाचा अभाव असल्यामुळे राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांकडून अग्रीम पिक विम्यासाठी निवेदन देण्यात आलेली आहेत. ज्या शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे अतिवृष्टी किंवा सततच्या पावसाच्या खंडामुळे झालेल्या नुकसानी कोटी Crop Insurance ॲपच्या माध्यमातून तक्रार केली असेल, अश्या सर्व शेतकऱ्यांना पिक विमा मिळणार आहे.

संबंधित लाभार्थी शेतकऱ्यांना 25% अग्रीम पिक विम्याची रक्कम देण्यासाठी राज्य शासनाकडून मंजुरी देण्यात आलेली असून लवकरच म्हणजे दिवाळीपूर्वी सर्व शेतकऱ्यांना 25% अग्रीम पिक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर ट्रान्सफर करण्यात येणार आहे. अशी माहिती कृषी विभाग व संबंधित शासनाच्या विभागाकडून देण्यात आली.

अतिवृष्टी + पावसाचा खंड

राज्यातील ज्या महसूल मंडळामध्ये 25% अग्रीम पिक विमा मंजूर झाला असेल, अश्याच पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक विम्याची रक्कम जमा करण्यात येईल. अग्रीम पिक विमा वितरित ज्या भागात अतिवृष्टी झालेली असेल, अश्या सुध्दा पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दिवाळीपूर्व आर्थिक मदत जमा करण्यात येईल.

👇👇👇👇👇👇

पावसाचा खंड, निधी वाटप शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment