Mahadbt Portal : महाडीबीटी फार्मर पोर्टलवर खरीप हंगाम 2023 करिता अनुदान तत्त्वावर बी-बियाणे अर्ज सुरू

Mahadbt Portal : शेतकरी मित्रांनो, दरवर्षी खरीप किंवा रब्बी हंगाम सुरू झाला, की कृषी विभागामार्फत महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अनुदान तत्त्वावर बियाणांचे वाटप केलं जातं. चालू वर्ष 2023 करिता कृषी विभागाकडून खरीप पिकांचे बियाणे वाटप सुरू झालेले असून यासाठीचा अर्ज कसा करावा ? ही माहिती आपण याठिकाणी पाहणार आहोत.

बियाणे अनुदानासाठी अर्ज सुरु

महाडीबीटी फार्मर पोर्टलवरती वैयक्तिक शेतकरी त्याचप्रमाणे प्रात्यक्षिक अंतर्गत खरीप हंगाम 2023 साठी बी-बियाण वितरण अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. ज्या शेतकऱ्यांना खरीप हंगामामध्ये आपल्या शेतात विविध प्रकारच्या पिकांची पेरण करण्यासाठी बियाणं हवं असतील, त्या शेतकऱ्यांनी महाडीबीटी फार्मर पोर्टलवर फलोउत्पादन या घटकाच्या अंतर्गत ऑनलाईन अर्ज करू शकतात.

शेतकऱ्यांना सोयाबीन, तूर, उडीद, मक्का, मूग इत्यादी विविध पिकाच्या बियाणाकरिता कृषी विभागाकडून अनुदान दिल जात. यावर्षी बी-बियाणे अनुदान ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत 25 मे 2023 देण्यात आलेली आहे, त्यामुळे इच्छुक शेतकऱ्यांना 25 मे अगोदर महाडीबीटी फार्मर पोर्टलवरती अर्ज सादर करावा लागणार आहे, त्यानंतर केलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी.

📜 अर्ज कसा करावा ? येथे क्लिक करुन पहा !

Leave a Comment