MahaDBT Login : महाडीबीटी फार्मर पोर्टलवर बी-बियाणे अनुदानासाठी अर्ज कसा करावा ?

MahaDBT Login : शेतकऱ्यांना खालीलप्रमाणे बी-बियाणे अनुदानासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल.

  • सर्वप्रथम शेतकऱ्यांना महाडीबीटी फार्म पोर्टलला भेट द्यावी लागेल, त्यानंतर त्या ठिकाणी नवीन नोंदणी करून लॉगिन करावे.
  • त्यानंतर अर्ज करा या पर्यायावर क्लिक केल्यानंतर पुढील स्टेप्समध्ये तीन घटक दिसतील. ज्यामध्ये कृषी यांत्रिकीकरण, सिंचन साधने व सुविधा फलोत्पादन इत्यादीचा समावेश असेल.
  • यामध्ये बियाणे औषधे व खते या पर्याय समोरील बाबी निवडा या बटणावर क्लिक करा.
  • त्यानंतर तुमचा तालुका, जिल्हा, गाव, गट क्रमांक निवडून घ्या.
  • ज्या बियांसाठी तुम्हाला अर्ज करायचा असेल, ती बियाणे यादीमधून निवडून घ्या.
  • वरील संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर अटी व शर्ती मान्य करून तुमचा अर्ज जतन करा.
  • तुम्ही जर या घटकांतर्गत सर्वप्रथम अर्ज करत असाल, तर तुम्हाला २३.६० पैसे इतकी रक्कम ऑनलाईन पद्धतीने भरावी लागेल.
  • रक्कम भरणा केल्यानंतर बियाणे अनुदानासाठीची पावती तसेच पेमेंट केलेली पावती प्रिंट आउट काढून तुमच्याजवळ ठेवून घ्या.

अशा पद्धतीने तुम्ही वरील पर्याय अवलंबून बियाणे अनुदानासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. अर्ज सादर केल्यानंतर कृषी सहाय्यक किंवा कृषी अधिकारी यांच्यामार्फत तुम्हाला लॉटरी निवड पद्धतीने निवडले जाईल, त्यानंतर बाजारात बियाणे खरेदीसाठी कृषी सहाय्यक यांच्याकडून बियाणे खरेदी पावती देण्यात येईल.