कामगारांना उपचारासाठी आर्थिक मदत देणारी गंभीर आजार सहाय्य योजना

मित्रांनो, राज्यशासनाकडून नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून विविध अशा योजना राबविण्यात येतात. ज्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना इत्यादी योजनांचा समावेश आहे; परंतु तुम्हाला माहित आहे का ? तुम्ही जर कामगार असाल, तर कामगार कल्याण मंडळाकडून गंभीर आजारासाठी गंभीर आजार सहाय्य योजना राबविण्यात येते, अंतर्गत कामगारांना 01 लाखापर्यंत आर्थिक सहाय्य देण्यात येतं.

गंभीर आजार सहाय्य योजना

दुर्धर आजारात कामगाराला आर्थिक मदत करण्यासाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाकडून गंभीर आजार सहाय्य योजना राबविण्यात येते. सदर योजनेअंतर्गत नोंदणीकृत कामगारांना 01 लाखापर्यंत आर्थिक मदत दिली जाते. सदर योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन कामगार कल्याण मंडळाकडून केलं जात आहे.

शासनाकडून कामगारांच्या उज्वल भविष्यासाठी कामगार कल्याण मंडळाकडून विविध कामगार योजना राबविण्यात येतात. कामगारांना रोजगार, त्यांची सामाजिक सुरक्षा, मुलांना शैक्षणिक अर्थसहाय्य, आरोग्य विषयी आर्थिक सहाय्य अशा विविध उपायोजनांच्या दृष्टिकोनातून शासनाकडून बांधकाम कामगार योजनेची सुरुवात करण्यात आली. याच माध्यमातून गंभीर व दुर्धर आजारासाठी कामगारांना लाखापर्यंतचे आर्थिक मदत देण्यात येते.

कोणत्या आजारासाठी आर्थिक मदत मिळणार?

हृदयरोग, कर्करोग, एचआयव्ही, ब्रेन हॅमरेज, ब्रेन ट्युमर, अर्धवायू इत्यादी प्रकारच्या गंभीर व दुर्धर आजारासाठी गंभीर आजार सहाय्य योजनेतून कामगारांना आर्थिक मदत देण्यात येते. सदर आजारांपैकी कोणत्याही आजारासाठी कामगारांना आर्थिक मदत हवी असल्यास, त्यांची नोंदणी असणे आवश्यक आहे.

किती रुपयांची आर्थिक मदत

सदरी योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या कामगारांना विविध आजारांचे स्वरूप पाहून आर्थिक मदत केली जाते. पाच हजार रुपये एक लाख रुपये आर्थिक मदत कामगार कल्याण मंडळाकडून गंभीर आजार साहाय्य योजनेत दिली जाते.

📢 लाभ कसा मिळवावा ? येथे क्लिक करून पहा

Leave a Comment