Insurance Policy : “या” जिल्ह्याची अंतिम पैसेवारी संबंधित विभागाकडून जाहीर, अखेर दुष्काळावर शिक्कामोर्तब

महाराष्ट्र राज्यात अवकाळी पाऊस किंवा गारपीटाने शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे नुकसान झाल्यास किंवा राज्यात इतर कारणास्तव दुष्काळ पडल्यास आपल्या कानावर आणेवारी/पैसेवारी असा शब्द सतत ऐकण्यात येत असतो. आता बऱ्याच जणांना पडलेला प्रश्न म्हणजे ? आणेवारी/पैसेवारी म्हणजे नेमकं काय असतं बाबा !

आणेवारी/पैसेवारी म्हणजे नेमकं काय?

महाराष्ट्र जमीन महसूल कायद्यानुसार जमीन महसूल थांबवण्यासाठी, कमी किंवा संपूर्णता रद्द करण्यासाठी प्रत्येक गावातील कोरडवाहू, खरीप किंवा रब्बी पिकांची पैसेवारी शासनाकडून काढली जाते, यालाच आणेवारी असं म्हटलं जातं किंवा आणेवारी हाच शब्द पुढे प्रचलित झाला.

महाराष्ट्र राज्यामध्ये दिनांक 15 डिसेंबर किंवा 15 जानेवारी पूर्वी अंतिम पैसेवारी ही जाहीर करण्यात येते. जालना या जिल्ह्याची अंतिम पैसेवारी जाहीर करण्यात आलेली असून या जिल्ह्यातील एकूण 971 गावाची अंतिम पैसेवारी 50 पैशापेक्षा खाली असल्याने जालना जिल्हा हा शासनाकडून दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात आलेला आहे. त्यामुळे जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला असून दुष्काळी उपाययोजनांचे अंमलबजावणी, शासनाकडून विविध मदत मिळण्याच्या अपेक्षा, शासकीय सवलती इत्यादी जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी निर्माण झाल्या आहेत.

जालना जिल्हा अंतिम पैसेवारी

जालना जिल्ह्याची अंतिम पैसेवारी तालुकानिहाय तुम्ही खालीलप्रमाणे रखाण्यात पाहू शकता.

तालुकागावेपैसेवारी
जालना15147
बदनापूर9245.97
भोकरदन 15744.24
जाफराबाद10148.21
परतूर9747.08
मंठा11746.43
अंबड13849.9
घनसावंगी11848.43
एकूण97147.06

📘 अधिक वाचा : 👇

कुसुम सोलरपंप योजना यादी

घरकुल योजना 8 जिल्ह्याची यादी

बोगस सातबारा कसा ओळखावा?

कुसुम सोलरपंप योजना सूचना !

कडबा कुटी मशीन अनुदान योजना

Leave a Comment