शेतजमिनीचा व्यवहार करताय ? सतर्क रहा, तुमच्यासोबत धोका होऊ शकतो, असा ओळखा बोगस सातबारा उतारा !

MP Land Record Identification : महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर जमिनीची खरेदी विक्री केली जाते. जमिनीची खरेदी विक्री करत असताना खरेदीदारांनी काही आवश्यक बाबीची काळजी घेणे अत्यंत आवश्यक असते. कारण महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये बनावट किंवा बोगस जमिनीशी निगडित कागदपत्र तयार करून कर्ज घेतल्याची किंवा जमिनीचा गैरव्यवहार केल्याची प्रकरण समोर आलेली आहेत. जमिनीचा व्यवहार करत असताना महत्त्वाच कागदपत्र म्हणजे जमिनीचा सातबारा होय. बोगस सातबारा कसा ओळखायच ? याबद्दलची महत्त्वाची माहिती आपण याठिकाणी पाहणार आहोत.

बोगस सातबारा ओळख

बोगस सातबारा उतारा वापरून कर्ज घेतल्याने संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल झाल्याची प्रकरणही महाराष्ट्रात घडली आहेत. त्यामुळे कोणताही जमिनीचा व्यवहार करत असताना संबंधित जमिनीचा सातबारा उतारा खरा की खोटा हे तपासण अत्यंत आवश्यक आहे. जमिनीचा सातबारा बोगस आहे, हे कसं ओळखायचं यासंदर्भातील महत्त्वाची 3 सोपी उपाय याठिकाणी आपण पाहूयात.

सामान्यतः आपण कोणताही सातबारा पाहिला तर, त्या सातबारा उताऱ्यावर जमिनीच्या मालकाविषयी आणि त्या जमिनीसंदर्भातील संपूर्ण माहिती देण्यात आलेली असते. परंतु सध्या बनावट कागदपत्र बनवून जमीन व्यवहाराची बेकायदेशीर काम केली जात आहेत. त्यामुळे सातबारा उताऱ्यावर देण्यात आलेली जमीन मालकाची माहिती व इतर माहिती खरी आहे किंवा खोटी आहे हे पाहणं अत्यंत गरजेचे असत. एखाद्या जमिनीचा सातबारा उतारा बोगस आहे की बरोबर हे पाहण्यासाठीच्या महत्त्वाच्या तीन गोष्टी खालीलप्रमाणे देण्यात आलेल्या आहेत.

  • 7/12 उताऱ्यावरील तलाठ्यांची सही
  • एलजी कोड (LG Code)
  • ई-महाभूमी लोगो
  • क्यूआर कोड

7/12 उताऱ्यावरील तलाठ्यांची सही

एखाद्या जमिनीचा सातबारा खरा किंवा खोटा ओळखण्याची पहिली महत्त्वाची बाब म्हणजे सातबारा उतारावरील तलाठ्यांची सही. सातबारा उताऱ्यावर तलाठ्यांची सही असतेच, त्यामुळे एखाद्या जमिनीचा व्यवहार करत असताना जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर तलाठ्यांची सही नसेल, तर तो सातबारा तुम्ही 100% बोगस समजू शकता.

सातबारा उताऱ्यावरील वारस नोंद आता घरबसल्या ऑनलाईन करा

शासनाकडून सर्व सरकारी व्यवहारांमध्ये डिजिटलायझेशन करण्यात आलेले आहे, त्यामुळे सध्या तलाठ्यांचा डिजिटल स्वाक्षरीचा सातबारा उपलब्ध करून दिला जातो. डिजिटल सातबाराच्या खालील बाजूस “सातबारा उतारावरील गाव नमुना 7 आणि गाव नमुना 12 डिजिटल स्वाक्षरी तयार केला असल्यामुळे त्यावर कोणत्याही सही शिक्याची गरज नाही” अशा प्रकारची सूचना दिसून येत असेल, तरीदेखील तो बोगस सातबारा समजावा.

एलजी कोड (LG Code) आणि ई-महाभूमी लोगो

जमिनीच्या सातबारा संबंधात होणाऱ्या फसवणुकी टाळण्यासाठी शासनाकडून सातबारा उतारामध्ये काही महत्त्वपूर्ण बदल मागील काळात करण्यात आली. या बदलापैकी दोन महत्त्वाचे बदल म्हणजे एलजी कोड आणि ई-महाभूमीचा लोगो. तुम्ही जर डिजिटल सातबारा काढत असाल, तर डिजिटल सातबारावर प्रत्येक गावाचा एक युनिक कोड गावाच्या समोरील कंसामध्ये लिहिलेला असतो.

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी ! नवीन गुंठेवारी कायदा आमलात

जर सातबारा उताऱ्यावर संबंधित गावाचा युनिकोड नसेल, तर असा सातबारा तुम्ही बोगस समजू शकता. यासोबतच सातबारा आणि 8 अ उताऱ्यावर वरच्या बाजूस ई-महाभुमी प्रकल्प आणि महाराष्ट्र शासनचा लोगो अनिवार्य देण्यात आलेला आहे. असा लोगो डिजिटल सातबारावर नसल्यास तुम्ही सातबारा बोगस आहे असं समजू शकता.

सातबारा क्यूआर कोड

शासनाकडून नवीन सुरू करण्यात आलेल्या सातबारा उताऱ्यावरून कोणत्याही प्रकारचा ऑनलाइन फॉर्म होऊ नये, यासाठी एक सर्वात महत्त्वाचा बदल करण्यात आला. तू महत्त्वाचा बदल म्हणजे जमिनीच्या सातबारा उतारावरील क्यूआर कोड होय. ऑनलाइन डिजिटल सातबारा डाऊनलोड करून प्रिंट केल्यानंतर त्यावरती क्यूआर कोड छापून येतो. हा विविध गटासाठी युनिक असून संबंधित गटाची संपूर्ण माहिती दर्शवितो. जर संबंधित सातबारा उताऱ्यावर क्यूआर कोड दिसत नसेल, तर नक्कीच जमिनीचा सातबारा उतारा बोगस आहे असे समजण्यास काही हरकत नाही.

Leave a Comment