Kusum Solar Yojana New Update : कुसुम सोलर पंप योजनेतील “या” शेतकऱ्यांना पुन्हा कागदपत्र अपलोड करावी लागणार !

Kusum Solar Yojana : शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी सुरू करण्यात आलेली कुसुम सोलरपंप योजना महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर गाजली आहे. मागील काही महिन्यापूर्वी कुसुम सोलारपंप नवीन नोंदणी प्रक्रिया सुरू झालेली होती. यामध्ये राज्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर नोंदणी केली. नोंदणी करत असताना काही शेतकऱ्यांनी घाई गडबडीत चुकीची कागदपत्रे किंवा कागदपत्रात अपलोड केली नव्हती.

परत कागदपत्र अपलोड आवश्यक

महाऊर्जा पोर्टलवर नोंदणी करत असताना विहीर नोंदसहित 7/12 उतारा अपलोड करावा लागतो. सामायिक क्षेत्र किंवा पाण्याचे स्त्रोत असल्यास इतर खातेदारांची हरकत नसल्याबाबतचा प्रमाणपत्र अर्जदारांना अपलोड करावा लागतो; परंतु सोलर पंपाचा कोटा लवकरात लवकर संपून जाईल, या भीतीने अर्जाचा कालावधी कमी असल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी आवश्यक ती कागदपत्र अपलोड न करताच फॉर्म सबमिट केला होता.

अशा सबमिट केलेल्या अर्जाची पुनरावलोकन प्रक्रिया सुरू झालेले असून सबमिट केलेल्या अर्जाच्या संख्येवर आधारित पुनरावलोकनाची प्रक्रिया सुरू झाली आहे. या प्रकरणात ज्या शेतकऱ्यांनी विहीर, बोरवेल किंवा इतर खात्यातील 7/12 उतारे, संमतीपत्र किंवा हरकत प्रमाणपत्र अपलोड केलेली नसतील, अशा शेतकऱ्यांच्या नोंदणी करत मोबाईलवर त्रुटी संदर्भात संदेश प्राप्त झाला आहे.

कुसुम सोलरपंप या जिल्ह्याची नवीन पात्र लाभार्थी यादी आली !

अर्जामध्ये त्रुटी असल्याचा संदेश प्राप्त झालेल्या अर्जदारांनी त्रुटी पूर्ण करण्यासाठी महाऊर्जाच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन आपला युजरनेम व पासवर्ड टाकून लॉगिन करून घ्यावे. लॉगिन केल्यानंतर संबंधित अर्जदारांची त्रुटी डॅशबोर्डला दाखवण्यात येईल. त्या ठिकाणी आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करून कागदपत्र अपलोड करावीत. अन्यथा संबंधित अर्जदाराला लाभ दिला जाणार नाही याची नोंद घ्यावी.

अर्जातील चुका खालीलप्रमाणे

  • विहीर बोरवेलची नोंद नसलेले 7/12 उतारे
  • सामायिक क्षेत्र किंवा पाण्याच्या स्त्रोतांबाबत इतर खातेदारांचे ना हरकत

महाऊर्जाकडून देण्यात आलेल्या Login Credential चा वापर करून तुम्हाला खालील आवश्यक कागदपत्र पीडीएफ फॉरमॅटमध्ये पोर्टलवर अपलोड करावी लागतील. त्यानंतर सबमिट पर्यायावर क्लिक करून अंतिम अर्ज सबमिट करावा लागेल.

  • 7/12 उतारा
  • 8अ उतारा
  • आधार कार्ड
  • बँक पासबुक
  • पासपोर्ट फोटो

Leave a Comment