MP Land Record : सातबारा उताऱ्यावरील वारस नोंद आता आँनलाईन घरबसल्या करा; तलाठ्यांकडे जाण्याची गरज नाही !

MP Land Record : महसूल विभागाकडून शेतकऱ्यांसाठी दिवसेंदिवस नवनवीन सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. मागील काही वर्षांमध्ये डिजिटल सातबारा, ऑनलाईन फेरफार उतारा, प्रॉपर्टी कार्ड अशा विविध सुविधा शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या. आता यामध्ये आणखी एक भर घालण्यात आलेली असून शेतकऱ्यांना आपल्या जमिनीच्या सातबारा उतारावरील वारसांची नोंद घरबसल्या ऑनलाईन करता येणार आहे.

आँनलाईन वारस नोंद

शेतकरी किंवा शेतकरी कुटुंबातील व्यक्तींना वारस जमिनीचा दाखला सातबारा उतारा फेरफार या सर्व बाबी माहीतच असतात; परंतु या कामासाठी कुटुंबातील सुशिक्षित व्यक्तींना तलाठी कार्यालयाच्या चक्रा माराव्या लागत असत. महसूल विभागाकडून यामध्ये अमुलाग्र बदल करून शेतकऱ्यांसाठी सर्व सुविधा घरबसल्या उपलब्ध करून दिल्या जात आहेत. ऑनलाइन वारस नोंद करण्याची नवीन सुविधा नव्हती महसूल विभागाकडून सुरू करण्यात आलेली आहे याबद्दलची थोडक्यात माहिती आपण याठिकाणी पाहुयात.

सर्वप्रथम वारस नोंद म्हणजे काय ? जर एखाद्या कुटुंबातील व्यक्तींचा मृत्यू झाला व त्या व्यक्तींच्या नावाने शेतजमीन किंवा इतर प्रॉपर्टी असेल, ती प्रॉपर्टी किंवा शेतजमीन हक्काने कुटुंबातील इतर व्यक्तीच्या नावाने करावयाची असेल, तर त्या व्यक्तीला वारस नोंद करावी लागते, याच सर्व प्रक्रियेला वारसांची नोंद करणे असे म्हणतात. पूर्वी वारस नोंद करण्याची प्रक्रिया खूपच अवघड व वेळखाऊ होती; परंतु आता या सर्वापासून सुटका होणार आहे महसूल विभागाकडून ऑनलाइन वारस नोंद करण्याची सुविधा सुरू करण्यात आलेली आहे.

शासनाकडून जनसामान्यांना मोठा दिलासा !

सातबारा उतारा किंवा इतर मालकी हक्काच्या प्रॉपर्टीवर वारस नोंद करण्यासाठी शेतकरी किंवा जनसामान्य नागरिकांना सरकारी कार्यालय किंवा तलाठी कार्यालयाचे हेलपाटे मारावे लागत असेल; परंतु आता घरबसल्या जमिनीसंदर्भातील वारस नोंदणी, वडिलोपार्जित जमीन, घर इत्यादीची ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे. शासनाकडूनच्या या निर्णयामुळे बहुतांश शेतकरी व जनसामान्य नागरिकांकडून कौतुक केल जात आहे. यामागचं कारणसुद्धा असंच कार्यालयाच्या चकरा मारा, त्यांना पैसे द्या ! कामसुद्धा वेळेत नाही, त्यामुळे कौतुक साहजिकच आहे !

वारस नोंदीसाठी लागणारी कागदपत्रे

  • मृत्यू दाखल्याची सत्यप्रत
  • वारसदारांचा आधार कार्ड
  • मयत व्यक्तींचा आधार कार्ड
  • मयत व्यक्तींचा ओळखपत्र
  • कुटुंबातील इतर सदस्यांच्या माहितीकरिता रेशन कार्ड
  • शपथपत्र
  • मृत व्यक्तीच्या जमिनीसंदर्भात कागदपत्र
  • इतर आवश्यक कागदपत्र

ऑनलाईन वारस नोंद कशी करावी ?

सर्वप्रथम वारसदारांना शासनाच्या महाभुमी संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल, त्यानंतर सर्वात शेवटी pdeigr या लिंकवर क्लिक करून उघडलेल्या वेबसाईटवर नोंदणी करावी लागेल. नोंदणी केल्यानंतर युजरनेम व पासवर्ड टाकून लॉगिन केल्यानंतर वारस नोंदीसाठी व इतर विविध दुरुस्तीसाठी पर्याय देण्यात आलेले आहेत, तुमच्या सोयीनुसार पर्याय निवडून तुम्ही वारस नोंदीची ऑनलाईन प्रक्रिया घरबसल्या तुमच्या मोबाईल किंवा कम्प्युटरच्या सहाय्याने करू शकता.

गाय, म्हशी खरेदीसाठी शासनाकडून 1लाख 60 हजार बिनव्याजी कर्ज; नक्की वाचा !

ऑनलाईनन वारस नोंद करत असताना वारसदारांची व मयत व्यक्तींची मूलभूत माहिती भरावी लागते. सोबतच कागदपत्र पडताळणीसाठी सर्व आवश्यक वरील नमूद कागदपत्र योग्य त्या प्रमाणात स्कॅन करून पोर्टलवरती अपलोड करावी लागतात. कागदपत्र अपलोड केल्याच्या पुढील 7 ते 15 दिवसांमध्ये तलाठी यांच्याकडून कागदपत्रांची पडताळणी करून सर्व कागदपत्र योग्य असल्यास वारसदारांची उताऱ्यावरती नोंद केली जाते.

येथे क्लिक करून ऑनलाईन वारस नोंद करा !

Leave a Comment