Goat Farming Loan : शेळीपालनासाठी ‘ही’ बँक 50 लाखापर्यंत कर्ज वाटप करते, वाचा सविस्तर माहिती

सध्यास्थितीत शेतकऱ्यांना शेतीमालाला योग्य भाव मिळत नसल्यामुळे परिणामी शेतकरी जोड व्यवसाय करण्याच्या मार्गाला लागलेले आहेत. कारण शेतीतील उत्पादन खर्चसुद्धा शेतकऱ्यांना मिळत नाही, त्यामुळे नवीन व्यवसाय किंवा जोडधंदा करून चांगला नफा मिळवावा. यासाठी बहुतांश शेतकऱ्यांनी शेळीपालन व्यवसाय निवडलेला आहे.

शेळीपालन व्यवसाय कर्ज योजना

व्यवसाय करत असताना शेतकऱ्यांना बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागते. यामध्ये आर्थिक अडचण सर्वात मोठी असून यासाठी तरुणांना जोडधंदा करता येत नाही; मात्र आता तुम्हाला शेतीसोबत जोडधंदा म्हणून शेळीपालन हा व्यवसाय करावयाचा असेल, तर बँकेकडून कर्ज दिलं जातं.

शेळीपालन व्यवसायासाठी बँकेकडून कर्ज कसं मिळवायचं? किती मर्यादेपर्यंत शेतकऱ्यांना कर्ज मिळेल ? कर्जासाठी कोणती आवश्यक कागदपत्र शेतकऱ्यांना तयार ठेवावी लागतील? कर्जाचा व्याजदर किती असेल? याबाबतची संपूर्ण माहिती आपण सदर लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत, त्यामुळे तुम्हाला सुद्धा शेळीपालन व्यवसाय करण्यासाठी बँकेकडून कर्ज हवा असेल, तर ही माहिती नक्की शेवटपर्यंत वाचा.

मुद्रा लोन योजना

शेळीपालन हा व्यवसाय गैर-कृषी व्यवसायात मोडतो. त्यामुळे या व्यवसायाला सरकारकडून सूक्ष्म-लघु आणि मध्यम व्यवसायाच्या श्रेणी ठेवण्यात आलेले आहे. महाराष्ट्र शासनाकडून शेळीपालनासाठी अनुदान तत्त्वावर शेळ्यांचे गट वाटप केले जातात; मात्र ही योजना अनुसूचित जाती-जमातींच्या शेतकऱ्यांसाठी असल्यामुळे इतर प्रवर्गातील शेतकऱ्यांना सदर योजनेचा लाभ मिळत नाही. अशावेळी सर्व प्रवर्गातील शेतकऱ्यांना शेळीपालन करण्यासाठी केंद्र सरकारच्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या माध्यमातून मुद्रा लोन योजना राबविण्यात येते. ज्याअंतर्गत नामांकित बँका शेतकऱ्यांना शेळीपालनासाठी कर्ज उपलब्ध करून देतात.

बँकेकडून 50 लाखापर्यंत कर्ज

देशातील उद्योग क्षेत्रातील नामांकित आयडीबीआय बँकेकडून शेतकऱ्यांना शेळीपालनासाठी कर्ज देण्यात येतं. बँकेच्या या योजनेचे नाव “कृषी कर्ज शेळी-मेंढी पालन” याप्रमाणे आहे. सदर योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना योग्य प्रमाणात कर्ज उपलब्ध करून देण्यात येतं. तुम्हालाही शेळीपालनासाठी कर्ज मिळवायचा असेल, तर आयडीबीआय बँक 50 हजारापासून ते 50 लाख रु.पर्यंत प्रकल्प मर्यादेनुसार किंवा अहवालानुसार कर्ज देते. या कर्जासाठी बँक तुम्हाला 7 टक्के इतका व्याजदर करू शकते.

कर्जासाठी आवश्यक कागदपत्रे

 1. पासपोर्ट आकाराचा फोटो
 2. मागील 6 महिन्यातील बँक स्टेटमेंट
 3. उत्पन्नाचा दाखला
 4. आधारकार्ड
 5. रहिवाशी दाखला
 6. पॅनकार्ड
 7. जातीचा दाखला (आवश्यक असल्यास)
 8. बीपीएल कार्ड (आवश्यक असल्यास)
 9. प्रकल्प अहवाल
 10. इतर आवश्यक कागदपत्र

अर्ज कसा व कुठे करावा?

 • शेळीपालन व्यवसाय करण्यासाठी तुम्हाला कर्ज मिळवायचे असल्यास जवळील आयडीबीआय बँकेच्या शाखेला भेट द्यावी लागेल.
 • त्याठिकाणी तुम्ही शेळीपालन व्यवसायासाठी कर्ज मिळवण्यासंदर्भात सविस्तर माहिती बँकेतील अधिकाऱ्यांकडून जाणून घेऊ शकता. त्यानंतर संबंधित योजनेचा अर्ज भरून लाभ मिळू शकतात.
 • अर्ज मिळाल्यानंतर अर्जामध्ये विचारण्यात आलेली संपूर्ण माहिती काळजीपूर्वक भरा व आवश्यक ते कागदपत्रे जोडून संपूर्ण प्रस्ताव बँकेत जमा करा.
 • बँकेकडून तुमच्या अर्जाची पडताळणी करण्यात येईल, पडताळणी झाल्यानंतर शेळी पालन व्यवसायाचा प्रकल्प अहवाल बघून कर्ज मंजुरी देण्यात येईल.

महत्त्वाची सूचना : काही बँकेकडून शेळीपालन व्यवसाय करण्यासाठी कर्ज उपलब्ध करून देण्यात येतो; परंतु काही बँकेकडून कर्ज उपलब्धता नसल्याची माहिती सांगितली जाते, त्यामुळे बँकेतील कर्मचाऱ्याशी नम्रतापूर्वक संवाद साधून यासंदर्भातील माहिती मिळवावी.

शेळीपालन व्यवसाय हा पशुधन व्यवसायअंतर्गत येणारा चांगला जोडधंदा असल्यामुळे या व्यवसायाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मास उत्पादनातून, दुग्ध उत्पादनातून मोठ्या प्रमाणावर कमाई करता येते. त्यामुळे व्यवसायिक पातळीवर मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांकडून शेळीपालन करत मोठी कमाई केली जाऊ शकते. अशातच तुम्ही शेळीपालन व्यवसाय करण्याची इच्छा बाळगत असाल, तर ही माहिती नक्कीच तुमच्या उपयोगी पडणार आहेत.

👇👇👇👇👇👇👇👇

इतर व्यवसायासाठी कर्ज देणारी मुद्रा लोन योजना येथे माहिती पहा

Leave a Comment