PM Mudra Loan : मुद्रा योजनेअंतर्गत तरुणांना मिळतय 5 लाखापर्यंत कर्ज ! अर्जप्रक्रिया व कागदपत्र कोणती असतील जाणून घ्या

PM Mudra Loan : केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून तरुणांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. यामध्ये मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना, पंतप्रधान रोजगार निर्मिती योजना, आबासाहेब पाटील कर्ज योजना अशा विविध प्रकारच्या योजनांचा समावेश आहे. या योजनांचा मुख्य उद्देश म्हणजे तरुणांना स्वबळावर त्यांचा स्वतःचा व्यवसाय वाढवता यावा हा होय. प्रधानमंत्री मुद्रा योजना यापैकीच एक महत्त्वकांक्षी योजना आहे. ज्या योजनेच्या माध्यमातून युवकांना व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करून दिलं जातं.

प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना

प्रधानमंत्री मुद्रा योजनेच्या माध्यमातून तरुणांना व्यवसायासाठी मोठ्या प्रमाणावर कर्ज वाटप केलं जातं. या योजनेची विशेषता म्हणजे योजनेचा लाभ मिळवत असताना कोणत्याही प्रकारचा शुल्क आकारला जात नाही, त्याचप्रमाणे विना गॅरंटी मुद्रा योजनेच्या माध्यमातून युवकांना कर्ज उपलब्ध करून दिलं जातं. कर्ज परतफेडीचा कालावधी सुद्धा पाच वर्षापर्यंत वाढविला जाऊ शकतो.

प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजना ही नरेंद्र मोदी यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेली नवयुवक व व्यावसायिकासाठीची महत्त्वकांक्षी योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून बिगर शेती आणि बिगर कॉर्पोरेट सूक्ष्म व लघु उद्योगांना कर्ज दिलं जातं. कर्जाची जास्तीत जास्त मर्यादा दहा लाख रुपयापर्यंत ठेवण्यात आलेली आहे. मुद्रा लोन योजनेसाठी अर्ज कसा करावा ? मुद्रा लोनचे विविध प्रकार कागदपत्र व ऑनलाईन अर्ज प्रक्रिया याबद्दलची थोडक्यात माहिती आपण याठिकाणी पाहूयात.

PM मुद्रा लोन प्रकार (Types)

अर्जदारांच्या गरजेनुसार प्रधानमंत्री मुद्रा लोन योजनेमध्ये विविध प्रकार तयार करण्यात आलेले आहेत. ज्यामध्ये शिशु कर्ज योजना, किशोर कर्ज योजना, तरुण कर्ज योजना या विविध प्रकारांचा समावेश आहे.

 • शिशु कर्ज : या प्रकारच्या मुद्रा योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना 50 हजार रुपयापर्यंत कर्ज वाटप केलं जातं.
 • किशोर कर्ज : या प्रकारच्या मुद्रा योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना 50 हजार ते 5 लाखापर्यंत कर्ज वाटप केलं जातं.
 • तरुण कर्ज : या प्रकारच्या मुद्रा योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना 05 लाखापासून ते 10 लाखापर्यंत कर्ज उपलब्ध करून दिलं जातं.

PM Mudra Loan साठी आवश्यक कागदपत्रे (Documents)

 • अर्जदारांच वय 18 वर्षापेक्षा कमी नसावं.
 • अर्जदार कोणत्याही बँकेत डिफॉल्टर नसावेत.
 • अर्जदारांचा आधार कार्ड
 • अर्जदारांचा पॅन कार्ड
 • कायमचा राहता पत्ता
 • व्यवसाय व स्थापनेचा पत्ता
 • मागील तीन वर्षाचा ताळेबंद
 • इन्कम टॅक्स रिटर्न किंवा सेल्फ टॅक्स रिटर्न
 • पासपोर्ट आकाराचा फोटो
 • उत्पन्न दाखला
 • शॉप ॲक्ट लायसन
 • लहान व्यवसाय सुरू करणारे उद्योजक किंवा तरुण प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजना 2023 चा लाभ मिळवू शकतात.

मुद्रा लोन अर्ज प्रक्रिया (Online Application Process)

सर्वप्रथम अर्जदारांना मुद्रा कर्ज योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल. मुद्रा लोन योजनेची अधिकृत वेबसाईट ओपन झाल्यानंतर तुमच्यासमोर योजनेचे विविध प्रकार दाखवले जातील, ज्यामध्ये शिशु, किशोर, तरुण यांचा समावेश असेल. तुमच्या गरजेनुसार तो प्रकार निवडून संपूर्ण अर्ज तुम्हाला व्यवस्थितरित्या भरून घ्यावयाचा आहे.

आता ॲपवर मिळवा सरकारी कर्ज; RBI चा नवीन प्लॅटफॉर्म तयार

अर्ज भरणा झाल्यानंतर अर्ज डाउनलोड करून त्यांची प्रिंट आऊट घ्यावयाची आहे. आमच्या सोबत सर्व आवश्यक कागदपत्र जोडून तुमच्या जवळील संबंधित बँकेत अर्ज जमा करावा. अर्ज जमा करण्यात आल्यानंतर अर्जदारांची संपूर्ण कागदपत्र व पात्रतेची पडताळणी केली जाईल जर अर्जदार पात्र असतील तर पुढील एक महिन्याच्या आत अर्जदारांना कर्ज वितरित केल जाईल.

मुद्रा लोन अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा !

Leave a Comment