eKYC करा नाहीतर मिळणार नाही घरगुती LPG गॅससाठी सबसिडी, सबसिडी बंद होणार

मोठ्या प्रमाणात घरात वापरला जाणारा घरगुती गॅस जवळपास 80 ते 90 टक्के नागरिकांकडे सध्या उपलब्ध आहे. LPG गॅस सबसिडी मिळवण्यासाठी ई-केवायसी करणे अनिवार्य असून eKYC नाही केल्यास संबंधितांना सबसिडी मिळणार नाही किंवा बंद होईल, याबद्दलची संपूर्ण माहिती याठिकाणी आपण पाहूयात.

LPG गॅस सबसिडी

जर तुमच्यासुद्धा घरात घरगुती गॅस तुम्ही वापरत असाल, तर ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. तुम्हाला माहीतच असेल काही प्रमाणात LPG गॅसवर नागरिकांना सबसिडी दिली जाते. देण्यात येत असलेली सबसिडी बहुतांश लोकांना मिळत आहे; परंतु जर तुम्ही eKYC केलेली नसेल, तर यापुढे तुम्हाला सुद्धा सबसिडी मिळणार नाही, त्यामुळे ही केवायसी करणे अत्यंत महत्त्वाचे व अनिवार्य आहे.

आता सर्वांना प्रश्न पडला असेल की, घरगुती LPG गॅससाठी eKYC कुठे करावी व कोणत्या गॅसधारकांना ई-केवायसी करणे अनिवार्य असेल तर याबद्दलची माहिती आपण पाहूयात. जर तुमच्या घरात शासनाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या प्रधानमंत्री उज्वला गॅस योजनेअंतर्गतचा महिलांना मोफत देण्यात आलेला गॅस असेल, तर eKYC करणे तुम्हाला अनिवार्य आहे; अन्यथा गॅससाठी शासनाकडून देण्यात येणारी 300 रु. रक्कम तुम्हाला मिळणार नाही.

eKYC कशी करावी ?

जर तुम्ही अद्याप गॅस सबसिडी मिळवण्यासाठी eKYC केलेली नसेल, तर तुम्ही खालीलप्रमाणे अधिकृत वेबसाईटवरती जाऊन eKYC प्रक्रिया संपूर्ण करून घेऊ शकता. खालील प्रक्रिया तुमच्याकडे कोणत्याही कंपनीचा गॅस सिलेंडर असेल, तर त्यासाठी लागू आहे.

  • ई-केवायसी करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम mylpg.in या वेबसाईटला भेट द्यावी लागेल.
  • वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला 3 गॅस सिलेंडर दिसतील, यापैकी तुमचा गॅस सिलेंडर ज्या कंपनीचा असेल त्या कंपनीच्या गॅस सिलेंडरवर क्लिक करा.
  • सिलेंडरवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल, या ठिकाणी उजव्या बाजूला दोन पर्याय दिसतील sign in आणि new user
  • जर तुमची नोंदणी यापूर्वी झालेली असेल, तर sign in या पर्यायावर क्लिक करा अन्यथा तुम्ही नवीन यूजर असाल, तर new user या पर्यायावर क्लिक करा.
  • त्यानंतर तुम्हाला तुमचा 17 अंकी एलपीजी क्रमांक टाकावा लागेल, त्याखाली तुमचा मोबाईल क्रमांक व कॅपच्या टाका व proceed या बटणावरती क्लिक करा.
  • लॉगिन झाल्यानंतर तुमच्या डाव्या बाजूला काही पर्याय दिसतील, आताही केवायसी करण्यासाठी aadhar authentication या पर्यायावर क्लिक करा.
  • समोर देण्यात आलेला कॅपच्या भरून घ्या त्यानंतर जनरेट ओटीपी या पर्यायावर क्लिक करा.
  • तुमच्या आधार क्रमांकला लिंक मोबाइलवरती एक ओटीपी पाठवण्यात येईल. संबंधित ओटीपी बॉक्समध्ये टाकून खाली देण्यात आलेल्या authenticate या बटनावर क्लिक करा.
  • आता तुम्हाला authentication successfully म्हणजेच ekYC पूर्ण झालेला मेसेज दिसेल.
  • अशा पद्धतीने तुम्ही HP सिलेंडरसाठीची ई-केवायसी घरबसल्या तुमच्या मोबाईलवर करू शकता.

Bharat गॅस eKYC

तुमच्याकडे जर भारत कंपनीचा गॅस सिलेंडर असेल, तर यासाठी तुम्हाला hello BPCL आणि Aadhaar FaceRd ही दोन एप्लीकेशन डाउनलोड करून ई-केवायसी पूर्ण करावी लागेल. यासाठी तुमच्याकडे गॅसकार्ड व आधारकार्ड असणे आवश्यक आहे. जर तुम्हाला eKYC करणे शक्य नसेल किंवा जमत नसेल, तर यासाठी तुम्ही तुमच्या जवळील सीएससी केंद्रातून मदत मिळवू शकता. याचप्रमाणे तुम्हाला इंडियन गॅसची ई-केवायसी करायची असेल, तर indianoil हा ॲप डाऊनलोड करावा लागेल.

📍 महिलांना आर्थिक सहाय्य देणारी – महिला किसान योजना

Leave a Comment