महिलांना 50 हजार आर्थिक सहाय्य देणारी योजना : Mahila Kisan Yojana Maharashtra

Mahila Kisan Yojana : केंद्र व राज्य शासनाकडून महिलांना सक्षम व आर्थिकदृष्ट्या सबळ बनवण्यासाठी विविध अशा योजना राबविण्यात येतात. या योजनेच्या माध्यमातून महिलांना अनुदान, आर्थिक मदत, कर्ज, विविध वस्तूंचा संच इत्यादी सुविधा उपलब्ध करून देण्यात येतात. या विविध योजनांमधील शासनाचा एकच उद्देश असतो, महिलांसुद्धा पुरुषाप्रमाणे कोणत्याही व्यवसायमध्ये किंवा कामांमध्ये मागे राहता कामा नये.

महाराष्ट्र शासनामार्फत महिलांना स्वंरोजगार उपलब्ध व्हावा या अनुषंगाने 2012 पासून राज्यामध्ये महिला किसान योजना सुरू करण्यात आली. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे चर्मकार समाजातील महिलांना समाजामध्ये मानाचे स्थान प्रदान करून देणे, सोबतच त्यांना आर्थिक व सामाजिकदृष्ट्या सक्षम बनवणे. या लेखामध्ये आपण महिला किसान योजना काय आहे ? यासाठीच्या पात्रता अटी व शर्ती अर्ज कसा करावा ? याबद्दलची थोडक्यात माहिती पाहणार आहोत.

अर्जाचा नमुना & अर्ज कसा करावा ? येथे क्लिक करून पहा

अटी व शर्ती : चर्मकार समाजातील ज्या महिला खालील प्रमाणे अटी व शर्ती पूर्ण करतील अशा महिलांना महिला किसान योजनेअंतर्गत लाभ देण्यात येईल.

  • अर्जदार महिला चर्मकार समाजातील म्हणजेच चांभार समाजातील असावी.
  • अर्जदार महिला महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणे आवश्यक.
  • महिलांचे वय कमीत कमी 18 व जास्तीत जास्त 45 वर्ष असावे.
  • अर्जदार महिला यापूर्वी कोणत्याही मंडळातून किंवा संबंधित संस्थेकडून अशा योजनांचा लाभ घेतलेला नसावा.
  • या योजनेसाठी महिला ग्रामीण भागातील असतील तर उत्पन्न मर्यादा 98,000 रु. व शहरी भागासाठी उत्पन्न मर्यादा 1,20,000 रु. इतकी आहे.
  • अर्जदाराकडे जातीचा दाखला असावा.

लाभ स्वरूप : महिला किसान योजनेमध्ये पात्र महिलांना 50,000 रु. आर्थिक मदत मधून दिली जाईल, ज्यामध्ये 10,000 रु. अनुदान (Subsidy) तर उर्वरित 40,000 रु. अनामत रक्कम 5% व्याजदराने (interest) दिली जाईल. या योजनेमध्ये सहभाग घेण्यासाठी महिलांच्या नावाने शेती असणे आवश्यक आहे. शेती जर पतीच्या नावाने असेल, तर तशा प्रकारचे प्रतिज्ञापत्र देणे अनिवार्य असेल.

आवश्यक कागदपत्र : आधारकार्ड, 7/12 व 8अ उतारा, बँक पासबुक, तहसीलदार यांच्यामार्फतचा उत्पन्न दाखला, रेशनकार्ड, रहिवाशी प्रमाणपत्र इत्यादी

Leave a Comment