Bank Loan : 1 एकर जमिनीसाठी साधारणतः शेतकऱ्यांना किती कर्ज दिलं जातं ? थोडक्यात माहिती !

Bank Loan : शेतकऱ्यांना अडी-अडचणीला पैशाची नड भासल्यास शासनाकडून पीक कर्ज योजना सुरू करण्यात आलेली आहे; म्हणजेच शेतकरी आपल्या शेतजमिनीवर काही प्रमाणात कर्ज मिळवू शकतो. राज्यातील बहुतांश शेतकरी अल्पभूधारक असल्यामुळे शेतकऱ्यांचा प्रश्न असतो की, आमच्या शेतजमिनीवर आम्हाला किती कर्ज बँकेकडून दिल जाईल ? तर याबद्दलची थोडक्यात माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून पाहुयात.

कमी शेतजमीन असल्यास पर्याय

शेती व्यवसाय करत असताना शेतकऱ्यांना विविध नैसर्गिक व अन्य अडचणींना सामोरे जावे लागते, त्यानंतरच शेतकऱ्यांना शेतातून उत्पादन काढता येतो. अशा अडचणीवर मात करत असताना शेतकऱ्यांना वेळी-अवेळी पैशाची गरज भासते. जर शेतकऱ्यांना कमी प्रमाणात पैशाची गरज भासल्यास आपले मित्र, नातेवाईक किंवा गावपातळीवर शेतकरी गरज भागवू शकतो; परंतु मोठ्या प्रमाणात पैशाची गरज भासल्यास शेतकऱ्यांना बँकेकडून पीक कर्ज काढावं लागतं.

ज्या शेतकऱ्यांकडे कमी शेतजमीन असेल, तर अशा शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त कर्ज मिळवण्यासाठी काय करायला हवं ? असासुद्धा प्रश्न बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनात उद्भभवतो. समजा, एका शेतकरी मित्राकडे फक्त 1 एकर जमीन आहे; परंतु त्यांना जास्तीत जास्त पैशाची आवश्यकता असेल, तर अशा परिस्थितीत शेतकरी विविध ठिकाणी मागणी करतो; परंतु जास्त प्रमाणात कर्ज देण्याची कोणत्याही बँकेची, संस्थेची तयारी नसते. त्यावेळी शेतकरी चिंतित होतो, यासाठी खालील पर्याय उपलब्ध आहेत.

1 एकरासाठी किती पीककर्ज ?

अडचणीच्या वेळी शेतकरी पीक कर्जाची मदत घेऊन चांगला लाभ मिळू शकतो. साधारणता: पीक कर्जाची रक्कम बँकेनुसार निरनिराळी असू शकते; परंतु अंदाजित सांगायचं झालं, तर एक एकर जमिनीवर बँकेकडून 30 ते 35 हजार रुपयापर्यंतच कर्ज दिलं जातं.

जर एखाद्या शेतकऱ्याला पैशाची मोठ्या प्रमाणावर गरज असेल, तर अशा परिस्थितीत शेतकऱ्यांकडे कोणताही पर्याय उपलब्ध नसल्यास, शेतकरी किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून 3 लाखापर्यंत कर्ज मिळवू शकतात. याबद्दलची अधिक माहिती तुम्ही खालील लिंकवर क्लिक करून वाचू शकता.

3 लाखापर्यंत कर्ज मिळवण्यासाठी KCC कार्ड कसं काढावं ? येथे क्लिक करून माहिती वाचा !

Leave a Comment