शेतकऱ्यांना बँक तात्काळ देत आहे, 3 लाख रुपयापर्यंत कर्ज; पहा संपूर्ण माहिती, कागदपत्र, पात्रता इत्यादी

Interest Free Loans : राज्य व केंद्रशासनाकडून शेतकऱ्यांना खरीप व रब्बी हंगामामध्ये काही प्रमाणात मदत व्हावी, यासाठी विविध कर्ज योजना राबविण्यात येतात. ज्यामध्ये अल्पमुदत कर्ज, कमी व्याजदरात कर्ज, शून्य व्याजदरात कर्ज इत्यादी विविध कर्ज योजनांचा समावेश आहे. शेतकऱ्यांसाठी शासनाकडून काही वर्षांपूर्वी एक अनोखा उपक्रम सुरू करण्यात आला. उपक्रम म्हणजे किसान क्रेडिट कार्ड (KCC) कार्यक्रम होय.

किसान क्रेडिट कार्ड (KCC) उपक्रम

एसबीआय किंवा अन्य बँकेमध्ये खात उघडणाऱ्या शेतकऱ्यांना या कार्यक्रमाच्या माध्यमातून शेती व्यवसायासाठी तीन लाख रुपयापर्यंतचा लाभ दिला जातो. नुकताच एका ट्विटमध्ये, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने माहिती दिली की, किसान क्रेडिट कार्ड कार्यक्रम शेतकऱ्यांना त्यांच्या कृषी आणि इतर गरजांसाठी बँकिंग प्रणालीद्वारे खूपच कमी व्याजदरावर कर्ज उपलब्ध करून देत.

या उपक्रमाअंतर्गत शेतकरी जास्तीत जास्त 7% व्याजदराने 3 लाख रुपयापर्यंत कर्ज घेऊ शकतात आणि ही घेतलेली कर्जाची रक्कम वेळेवर परतफेड केल्यास शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अतिरिक्त 3% सवलत दिली जाते.

1) शेतकऱ्यांसाठी सोयीस्कर व्याजदर : किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून शेतकऱ्यांना एकदम मुबलक प्रमाणात परवडणाऱ्या व्याजदरात कर्ज उपलब्ध करून दिले जाते, जेणेकरून त्यांना व्याजदराचा अतिरिक्त भार पडणार नाही आणि त्यांच्या शेतीसाठी आर्थिक मदतसुद्धा मिळेल.

2) सोप्यापद्धतीने कर्ज उपलब्ध : इतर कर्ज प्रक्रियापेक्षा किसान क्रेडिट कार्ड कार्यक्रमाच्या माध्यमातून कर्ज घेण्याची प्रक्रिया एकदम सुलभ व सोयीस्कर असल्यामुळे शेतकऱ्यांना त्वरित कर्ज दिलं जातं. आणि तातडीने शेतीशी संबंधित विविध कामासाठी या कर्जाचा वापर करता येतो.

3) व्याज सवलत : ज्या शेतकऱ्यांनी किसान क्रेडिट कार्ड कार्यक्रमाच्या माध्यमातून घेतलेला कर्ज वेळेत परतफेड केला असेल, त्यांना व्याजदरात 3% कपात दिली जाते. त्यामुळे इतर कर्ज योजनेपेक्षा हा एक फायदेशीर पर्याय ठरू शकतो.

आवश्यक कागदपत्रांची यादी

  • ओळखीचा पुरावा म्हणून ड्रायव्हिंग लायसन, पासपोर्ट, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र यापैकी एक
  • पत्त्याचा पुरावा म्हणून ड्रायव्हिंग लायसन्स ,आधार कार्ड इत्यादी
  • जमिनीचा 7/12 उतारा
  • जमिनीचा 8-अ उतारा
  • दोन पासपोर्ट आकाराचे फोटो
  • 1.60 लाख/रु. पेक्षा जास्त कर्जासाठी सुरक्षा दस्तवज

किसान क्रेडिट कार्ड कार्यक्रमांतर्गत शेतकऱ्यांना सहभाग नोंदविण्यासाठी सर्वप्रथम PM किसानच्या वेबसाईटवरून KCC फॉर्म डाऊनलोड करून घ्यावा लागेल. फॉर्मवर अर्जदारांची संपूर्ण माहिती लिहावी लागेल त्यानंतर शेतीशी संबंधित सर्व कागदपत्र फॉर्मसोबत जोडून. तुमच्या जवळील संबंधित बँकेत जशाप्रकारे स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI ), बँक ऑफ बडोदा (BOB) किंवा तुमच्यासाठी जी बँक सोईस्कर असेल अथवा PM किसान सन्मान योजनेचा हप्ता ज्या बँकेत पडत असेल त्या बँकेच्या शाखेमध्ये जाऊन ही कागदपत्र जमा करावी लागते.

किसान क्रेडिट कार्ड योजनेसाठी अर्ज कसा करावा ?

👉 येथे क्लिक करा 👈

Leave a Comment