Falbag Pik Vima : दिवाळीपूर्वीच तब्बल 54 हजार शेतकऱ्यांना मिळणार फळ पिक विमा ! पहा संपूर्ण महसूल मंडळाची यादी

Soon Banana fruit Crop Insurance beneficiaries will get benefit on their account, the estimated beneficiaries are 54,000, it’s good news for Maharashtra Jalgaon Farmers

Falbag Pik Vima : शासनाकडून राबविण्यात येत असलेल्या हवामान आधारित फळ पीक विमा उतरवत असलेल्या सर्व शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. आत्तापर्यंत सुधारित हवामान आधारित पिक विमा योजना अंबिया बहार अंतर्गत एकूण जवळपास 78,000 शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील फळांचा पिक विमा उतरवला आहे.

Crop Insurance Distribution

काँग्रेसच्या खासदार रक्षा खडसे यांच्यामार्फत माहिती देण्यात आली की, फळविम्याची प्रतीक्षा करत असलेल्या तब्बल 54,000 शेतकऱ्यांना त्यांच्या फळ पिक विम्याची नुकसान भरपाई दिवाळी पूर्वीच 4 ते 5 दिवस आधी थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. एकूण 78,000 सहभागी झालेल्या शेतकऱ्यांपैकी 54,000 शेतकऱ्यांना पिक विमा चा लाभ मिळणार असून उर्वरित 11,000 शेतकऱ्यांनी पिकाची लागवड करण्यापूर्वी विमा उतरवला आहे आणि 13,000 शेतकऱ्यांनी लागवडीपेक्षा जास्त क्षेत्राचा विमा उतरवला आहे त्यामुळे त्यांच्या अर्जाची खात्री करून त्यांना पिक विमा देण्याची शंका आहे.

खासदार खडसे यांच्यामार्फत अधिकची माहिती अशी देण्यात आली की, ज्या शेतकऱ्यांनी रीतसर फळ पिकांचा विमा काढलेला होता; परंतु अद्याप विम्याचा लाभ घेतलेला नाही, अशा सर्व शेतकऱ्यांना सर्व प्रमाणपत्रासह आपापल्या तालुक्यातील कृषी कार्यालयात अर्ज करावयाचा आहे.

केळी या फळ पिकासाठी पात्र महसूल मंडळे

  • रावेर- खिर्डी बुद्रुक, खिरोडा, निंभोरा बुद्रुक, सावदा, रावेर, खानापूर, ऐनपूर
  • चोपडा- अडावद, लासूर, धानोरा प्रा. चोपडा, गोरगावले, हाटेड बुद्रुक, चहार्डी
  • मुक्ताई नगर – घोडसगाव, अंतुर्ली, कोल्हा, मुक्ताई नगर
  • यावर-बालोद, ठाकरे, झिंगणबुद्रुक, बामणोड, यावर, फाजपूर
  • भुसावळ-वरणगाव, पिंपळगाव खुर्द, भुसावळ
  • जमना-नेरी, शेंदुर्णी, मालदाबादी, जमना, पाहुल

महाराष्ट्र राज्यातील जळगाव जिल्ह्यातील वरील नमूद सर्व महसूल मंडळांना लवकरच केळी या पिकासाठीचा पिक विमा दिवाळीपूर्व त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ही बाब आनंदाची असून त्यांना दिवाळी नक्कीच आनंदाची ठरणार आहे.

📣 भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना संपूर्ण माहिती

Leave a Comment