भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना माहिती : Bhausaheb Fundkar Falbag Lagwad Yojana

राज्य सरकारच्यावतीने शेतकऱ्यांना फळबाग लागवडीसाठी भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना सुरू करण्यात आली. योजनेच्या माध्यमातून इच्छुक व पात्र शेतकऱ्यांना फळबाग लागवडीसाठी अनुदान दिलं जातं. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांना लाभ मिळू शकत नाही, त्यांच्यासाठी सदरची योजना 20 जून 2018 रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आली.

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना

सदर योजनेच्या माध्यमातून 16 बहुवार्षिक फळ पिकांच्या कलमे रोपाची लागवड करता येते. मागील वर्षांमध्ये 35 हजार हेक्टर इतके क्षेत्र फळझाडे लागवडीखाली येण्याची अपेक्षा कृषी विभागामार्फत दर्शविण्यात आली होती. कोविडमुळे सन 2020-21 व 2022 वर्षासाठी ही योजना राबविण्यात आली नव्हती, परंतु चालू वर्ष 2023-24 मध्ये राबविण्यासाठी शासनाने मान्यता दिली आहे.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांना लाभ मिळत नाही किंवा शेतकरी फळबाग लागवडीकरिता पात्र ठरू शकत नाहीत. अशा वैयक्तिक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेण्याची संधी आहे. ही 100 टक्के राज्यपुरस्कृत योजना असून संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन असून, महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करता येईल.

या फळझाडांसाठी लाभ

आंबा, काजू, पेरु, डाळिंब, कागदी लिंबू, मोसंबी, संत्रा, नारळ, सीताफळ, आवळा, चिंच, जांभूळ, कोकम, फणस, अंजीर, चिकू, इत्यादी लागवड करून अनुदान मिळविता येईल.

योजनेसाठी अटी व शर्ती

  • शेतकऱ्यांच्या स्वतःच्या नावाने 7/12 उतारा असावा
  • शेतकऱ्यांकड स्वतःच्या नावावर कमीत कमी 20 गुंठे जमीन असावी
  • जर सातबारा उताऱ्यावर संयुक्त खातेदार असतील, तर खातेदारांच फळबाग लागवडीसाठी संमतीपत्र
  • सातबारा उताऱ्यावर कुळाच नाव असेल, तर कुळाचे संमतीपत्र
  • ज्या शेतकऱ्यांची उपजीविका शेतीवर अवलंबून असेल, अशा शेतकऱ्यांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल.

अनुदान मर्यादा किती ?

लाभार्थी शेतकऱ्यांना अनुदान 03 टप्प्यांमध्ये देण्यात येईल. अनुदान 100 टक्के असले, तरी अनुदान हे तीन वर्षाच्या कालावधीत मिळणार. प्रथम वर्षी 50 टक्के दुसऱ्या वर्षी 30 टक्के व तिसऱ्या वर्षे 20 टक्के याप्रमाणे अनुदान वाटप करण्यात येईल.

जमीन किती असावी लागते ?

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे कमीत कमी 20 गुंठे जमीन असावी, ही अट कोकण विभागातील शेतकऱ्यांसाठी कमी करून 10 गुंठे करण्यात आली आहे. कोकणातील शेतकऱ्यांना फळबाग लागवडीसाठी कमाल मर्यादा 6 हेक्टर आहे, तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी ही मर्यादा 10 हेक्टर आहे. उपलब्ध क्षेत्रामध्ये शेतकरी विविध फळबागांची लागवड करू शकतात.

फळबाग लागवड योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

  • 7/12 व 8अ उतारा
  • बँक पासबुक झेरॉक्स
  • शेतकरी हमीपत्र
  • संयुक्त खातेदार असल्यास संमतीपत्र
  • जातीचे प्रमाणपत्र (आवश्यक असल्यास)

अर्जाची ऑनलाईन पद्धत

इच्छुक शेतकरी फळबाग लागवडीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. त्यासाठी सर्वप्रथम MahaDBT Farmer Login करून त्याअंतर्गत फलोत्पादन घटकात भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेसाठी अर्ज करावा लागेल. शेतकऱ्यांना 01 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर या कालावधीमध्ये अर्ज करावा लागतो.

लागवड, पीक अंतर, अनुदान, मार्गदर्शक सूचना इत्यादीसाठी येथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा !

Leave a Comment