e-ration card : राज्यात आता नागरिकांना ई-रेशन कार्डच मिळणार !

e-ration card : महाराष्ट्र शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून रेशन कार्डधारकांसाठी सतत नवनवीन बदल करण्यात येतात. मागील काही दिवसापासून शिधापत्रिकाधारकांना ई-रेशन कार्ड देण्याची प्रक्रिया सुरू होती; परंतु या कामाला मध्यंतरी ब्रेक लागलेला होता; परंतु आता राज्यात यापुढे प्रत्येक नागरिकाला ऑनलाइन स्वरूपाचे e-ration card वाटप करण्यात येणार आहे, याची वितरण प्रक्रिया सुरू झालेली असून लवकरच राज्यातील संपूर्ण शिधापत्रिकाधारकांना या कार्डचा वाटप केलं जाणार आहे.

ही कार्ड बंद होणार !

एखाद्या नागरिकाकडून रेशन कार्डची मागणी करण्यात आली किंवा त्यामध्ये दुरुस्ती करण्याची वेळ आली, तर यापुढे अशा नागरिकांना ई-रेशन कार्ड दिले जाणार आहे. त्यामुळे पिवळ्या व केशरी रंगातील पारंपारिक रेशनकार्ड कालांतराने बंद होणार.

राज्य शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून नागरिकांना पारदर्शकता आणण्यासाठी किंवा कोड असलेला रेशनकार्ड देण्याचा निर्णय घेतला आहे. शासनाच्या या नवीन प्रणालीमुळे नागरिकांना घरबसल्या रेशन कार्डच्या अर्जामध्ये बदल, पत्ता बदलणे, गावातील दुरुस्ती त्याचप्रमाणे रेशनकार्डमध्ये नवीन नाव समाविष्ट करणे, नवीन नाव वगळणे ही कामे करता येणार आहेत.

Digilocker मध्ये दिसणार रेशनकार्ड

ई-रेशनकार्ड नागरिकांना वाटप केल्यानंतर रेशनकार्डची कॉपी डीजी लॉकर्समध्येसुद्धा उपलब्ध होणार आहे. नागरिकांना ई-मेल, मोबाईल इत्यादीच्या माध्यमातून पीडीएफ, फोटो स्वरूपात ई-रेशनकार्ड हव्या त्याठिकाणी उपलब्ध होईल, त्याचप्रमाणे नागरिक सहज व सोप्या पद्धतीने जवळील ई-सेवा केंद्रातून देखील ई-रेशनकार्ड डाउनलोड करू शकतील, यामुळे दैनंदिन कामकाजासाठी रेशनकार्ड सोबत बाळगण्याची आवश्यकता भासणार नाही.

2 पानांचच रेशनकार्ड असणार

शासनाकडून देण्यात येणारं नवीन रेशनकार्ड A4 आकारातील दोन पानाचं असेल. यावर जुन्या रेशनकार्ड प्रमाणेच सर्व माहिती स्पष्ट अक्षरात प्रिंट केलेली असेल, त्याचप्रमाणे या कार्डवर क्यूआर कोडसुद्धा देण्यात येईल, यामुळे ज्याठिकाणी रेशनकार्डचा वापर होत असेल, त्याठिकाणच्या संबंधित कार्यालयाकडून किंवा विभागाकडून क्यूआर कोड स्कॅनिंग केली जाईल आणि संबंधित योजनेचा लाभ किंवा इतर रेशनकार्ड संबंधित लाभ नागरिकांना देण्यात येतील.

💁 हे पण वाचा : रेशन दुकानात आता यासुध्दा सुविधा मिळणार; वाचा संपूर्ण माहिती !

रेशन दुकानातील कामकाज ई-पॉस मशीनवर चालत असल्यामुळे शिधापत्रिकाधारकांना दुकानात जुना रेशनकार्ड घेऊन जाण्याची गरज भासणार नाही. आता यापुढे राज्यात ई-रेशनकार्ड देण्याचा निर्णय घेण्यात आलेला असून रेशनकार्डमधील बदल किंवा नवीन रेशनकार्ड देताना ई-रेशन कार्ड नागरिकांना दिलं जाईल. सध्या वापरत असलेला पिवळा किंवा केशरी रेशनकार्ड लवकरच ग्राह्य धरला जाणार नाही.

लवकरच सर्वांना ई-रेशनकार्ड मिळणार

राज्य शासनाकडून ई-रेशनकार्ड देण्याबाबत 21 फेब्रुवारी रोजी आदेश निर्गमित करण्यात आलेला होता. आवश्यक संगणक प्रणाली विकसित करण्यात आलेली असून या प्रक्रियाद्वारे राज्यातील सर्व जिल्ह्यात कामकाज सुरू आहे. काही जिल्ह्यातील अन्नधान्य वितरण कार्यालयात प्रायोगिक तत्त्वावर दोन ते तीन शिधापत्रिकाधारकांना ई-रेशनकार्डच वितरणसुद्धा करण्यात आलेलं आहे. त्यामुळे राज्यातील सर्व शिधापत्रिका धारकांना लवकरच ई-रेशनकार्ड वाटप करण्यात येईल.

4 thoughts on “e-ration card : राज्यात आता नागरिकांना ई-रेशन कार्डच मिळणार !”

Leave a Comment