डिजिटल क्रॉप सर्वे ॲप 2023 शेतकऱ्यांना मदतीसाठी आता शासनाच्या नवीन ॲपवरूनच नुकसान भरपाई नोंदणी करावी लागणार

शेतकऱ्यांना नुकसान भरपाई त्वरित व पारदर्शक पद्धतीने मिळावी, यासाठी शासनाकडून सतत नवनवीन प्रयोग व संकल्पना राबविण्यात येतात. पिकाची नोंद योग्य पद्धतीने व्हावी, यासाठी 15 ऑगस्ट 2021 पासून राज्यात ई-पीक पाहणी ॲपची निर्मिती शासनाकडून करण्यात आली. ज्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या मोबाईलवरती एकदम सोप्या पद्धतीने शेतात पेरलेल्या पिकाची नोंद करणं सोपं झालं.

डिजिटल क्रॉप सर्वे ॲप

ई-पीक पाहणी प्रमाणेच आता पीक विम्यातून दिली जाणारी नुकसान भरपाई, आपत्कालीन पीक परिस्थिती इत्यादीसाठी शासनाकडून एक नवीन ॲप विकसित करण्यात येणार असून या ॲपचं नाव डिजिटल क्रॉप सर्वे ॲप असं असेल. या ॲपच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या पिकाच नुकसान झाल्यास पिक विम्यातून दिला जाणारा नुकसान भरपाई मोबदला त्याचप्रमाणे आपत्कालीन परिस्थितीत पिकांची नोंद शेतकऱ्यांना अचूक पद्धतीने देता यावी, यासाठी ॲप विकसित करण्यात आलेला आहे

प्रायोगिक तत्त्वावर राज्यातील 114 गावांमध्ये डिजिटल क्रॉप सर्व ॲपची अंमलबजावणी सुद्धा सुरू करण्यात आलेली आहे. याची अचूक माहिती प्राप्त झाली असून पुढील वर्षापासून राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये या ॲपमधून आपत्कालीन पिकांची परिस्थिती व विम्यातून दिलेल्या नुकसान भरपाईसाठी नोंदणी केली जाईल.

या योजनेतून तरुणांना 5 लाखापर्यंत कर्ज मिळत आहे; पहा संपूर्ण माहिती

केंद्रशासनाकडून तयार करण्यात आलेल्या डिजिटल क्रॉप सर्वे ॲपचे राज्यातील प्रत्येक तालुक्यातील प्रत्येकी 2 गावांमध्ये मिळून एकूण 114 गावांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर अंमलबजावणी 01 ऑगस्टपासून सुरू करण्यात आलेली आहे. महाराष्ट्रसह इतर 12 राज्यात प्रायोगिक तत्त्वावर हा ॲप वापरण्यास सुरुवात झाली असून याचा फायदा सर्वच शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर होईल.

50 मीटरच्या आतील फोटो बंधनकारक

पूर्वीच्या ॲपमध्ये गट क्रमांकाच्या मध्यबिंदूपासून ज्या ठिकाणाहून फोटो काढता येईल, त्याचे अंतर गृहीत धरले जात होते; परंतु आता जास्त अंतरावर फोटो काढता येणार नाही. पिकांचे 100% फोटो उपलब्ध व्हावेत, यासाठी नवीन ॲपमध्ये काही अमुलाग्र बदल करण्यात आलेले आहेत. फोटोच्या अंतरामधील ही नवीन अट ॲपमध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहे

Digital Crop Survey App

Leave a Comment