Crop Loan : खरीप हंगामात कोणत्या पिकाला किती पीककर्ज मिळणार? दर निश्चित

Crop Loan : शेतकरी मित्रांनो, लवकरच खरीप हंगाम सुरू होईल, शेतकऱ्यांना बी-बियाणे, खत, औषध, पाणी इत्यादीसाठी पैशाची आवश्यकता नक्कीच भासणार आहे. यासाठी शेतकरी पीक कर्जाकडे वळतील. यावर्षी खरीप हंगामात कोणत्या पिकाला किती पीक कर्ज दिलं जाईल? याची दर निश्चिती शासनाकडून करण्यात आली आहे, याबद्दल थोडक्यात माहिती आपण या लेखांमध्ये पाहूयात.

सोयाबीन, कापसाला किती Crop Loan मिळणार ?

खरीप हंगामाला अगदी एक महिनाच शिल्लक राहिला आहे. त्या अनुषंगाने खरीप हंगामातील पीक कर्जाचे दर निश्चित करण्यात आलेले असून त्यानुसार सोयाबीनकरिता 51 हजार रूपये, तर कापसाकरिता तब्बल 60 हजार रुपये प्रति हेक्टर दराने पीककर्ज यावर्षी वाटप केलं जाणार आहे.

खरीप हंगाम सुरू होण्याच्या दोन महिन्याआधीच दरवर्षी पिक कर्जाचा दर निश्चित केला जातो; परंतु यंदा पीककर्ज दर निश्चितीसाठी विलंब झाल्यामुळे बऱ्याच बँकांमार्फत पीक कर्जाचे वाटप सुरु करण्यात आले आहे. राज्यस्तरीय बॅंकर्स समितीच्या बैठकीत पीक कर्जाचे दर उचांक निश्‍चित करण्यात आले होते.

🌾 इतर पिकांच्या हेक्टरी पीककर्ज दरासाठी येथे क्लिक

पीककर्ज दर निश्चित करण्यात आल्यानंतर राज्यातील विविध जिल्हा बँकांना कर्ज वाटपासाठी लक्षांक दिला जातो, जश्याप्रकारे अमरावती जिल्हासाठी यावर्षी १४५० कोटी रुपयांचा लक्षांक ठरविण्यात आला आहे. यासोबतच तांत्रिक घटाने निश्चित केलेले दर बँकांमार्फत स्वीकारन्यात आलेले आहेत. साहेबांना हेक्टरी 51 हजार, तर कपाशीला 60 हजार पीककर्जाचा दर निश्चित करण्यात आला आहे.

Leave a Comment