Crop Insurance : महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना शेतकऱ्यांसाठी 1 रुपयात पिक विमा योजना सुरू करण्याची घोषणा करण्यात आली, त्यानुसार पिक विमा योजनेला “सर्वसमावेशक पिक विमा योजना” असं नाव देण्यात आलं आणि योजनेची सुरुवात करण्यात आली. पिक विमा योजना फक्त 1 रुपयात सुरू करण्यात आल्यामुळे सन 2023-24 या चालू वर्षात शेतकऱ्यांकडून पीक विमा योजनेला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला.
पीक विमा अर्जात त्रुटी
बहुतांश शेतकऱ्यांकडून पिक विमा उतरवण्यात आलेला असला, तरी तांत्रिक अडचण व सीएससी केंद्रचालकामार्फत भरण्यात येणाऱ्या विम्यामध्ये काही त्रुटी आढळून येऊ शकतात. यामधील पिक विमा भरण्याची शेवटची तारीख संपल्यापासून पुढील 1 ते 2 महिन्यात त्रुटीत आलेल्या शेतकऱ्यांचे फॉर्म परत पाठवले जातात. परत आलेल्या फॉर्ममध्ये दुरुस्ती करावी लागते, यासंदर्भातील थोडक्यात माहिती या ठिकाणी आपण पाहूयात.
ज्या शेतकऱ्यांच्या पिक विमा अर्जामध्ये काही कारणास्तव त्रुटी आलेली असेल, अशा सर्व शेतकऱ्यांच्या मोबाईलवरती एसएमएस पाठवण्यात आला आहे, परंतु जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती त्रुटी संदर्भातील कोणताही एसएमएस आलेला नसेल, तर तुम्ही तुमच्या पिक विमा अर्जाची सध्यास्थिती खालीलप्रमाणे तपासून निश्चित करू शकता की तुमच्या अर्जामध्ये त्रुटी आहे किंवा नाही ?
पिक विमा अर्जाचा सध्यास्थिती (Status) खालीलप्रमाणे चेक करा
- सर्वप्रथम पिक विमा योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जावा त्यासाठी येथे क्लिक करा.
- तुम्हाला खालीलप्रमाणे पिक विमा योजनेचा डॅशबोर्ड दिसेल, त्यामधील एप्लीकेशन स्टेटस या पर्यायावर क्लिक करा.

- त्यानंतर तुम्हाला खालीलप्रमाणे रखाना दिसेल, त्याठिकाणी तुम्हाला तुमचा अर्ज क्रमांक टाकावा लागेल, सोबतच कॅपच्या कोड देण्यात आलेला असेल तो कॅपचा कोड टाकून चेक स्टेटस या बटणावर क्लिक करा.

- पुढे खालीलप्रमाणे स्टेटस दाखवले जाईल, ज्यामध्ये जर Approved असं दाखवत असेल, तर तुमचा पिक विमा अर्ज कंपनीने स्वीकारला आहे, असं तुम्ही समजू शकता.

- आणि जर अर्ज तपासणी केल्यानंतर Reverted दाखवत असेल, तर आपल्या अर्जामध्ये त्रुटी आहे, असं तुम्ही समजू शकता.

त्रुटी असल्यास हे काम करा ?
ऑनलाईन अर्जाची स्थिती तपासल्यानंतर तुमच्या पिक विमा अर्जामध्ये त्रुटी दिसत असेल, तर तुम्ही ज्या ठिकाणी तुमचा पिक विमा अर्ज भरलेला होता. त्या ठिकाणच्या सीएससी केंद्रावर जाऊन त्रुटी पूर्तता करून घ्यावी लागेल. त्यासाठी आधारनुसार असलेले नाव आणि सातबाऱ्यावरील नाव वेगळे असू शकते. यावेळी तुम्हाला स्टॅम्प पेपरवरती त्यासंदर्भातील मायना लिहून तो बॉण्ड अपलोड करावा लागतो. सोबतच पिक पेरा स्वयघोषणापत्र नसेल, तर ते अपलोड करावे किंवा बँक पासबुक नसेल तर, तो अपलोड करावा, तरी अर्जामध्ये त्रुटी असलेल्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपल्या सीएससी केंद्रावर जाऊन त्रुटी पूर्तता करून घ्यावी.

ई-पीक पाहणीसाठी शेवटची 3 दिवस शिल्लक; तुमची ई-पीक पाहणी झाली का ?