e pik pahani status : कृषी विभागाकडून शेतकऱ्यांसाठी विविध नवनवीन सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. यामधील महत्त्वाची एक सुविधा म्हणजे ई-पीक पाहणी ज्याअंतर्गत शेतकऱ्यांना आपल्या पिकांचा पेरा म्हणजेच शेतातील पिकाची माहिती स्वतः मोबाईलवरती नोंदविता येते. शेतकऱ्यांना सहज व सोप्या पद्धतीने मोबाईल ॲप्लिकेशनच्या मदतीने ई-पीक पाहणी करता येते.
ई-पीक पाहणी स्टेटस
ई-पीक पाहणी केल्यानंतर आपल्या सातबारा उताऱ्यावर पिकाची नोंद होणं तितकंच महत्त्वाच आहे. म्हणजेच शेतकऱ्यांमार्फत मोबाईलवरून नोंदविण्यात आलेल्या पिकांची माहिती यशस्वीरित्या झालेली आहे का ? ही बाब जाणून घेणार अत्यंत महत्त्वाचा आहे; अन्यथा संबंधित शेतकऱ्यांचा उतारा कोरा राहून त्यांना पिक विमा, अतिवृष्टी अनुदान यासारख्या बाबीपासून वंचित राहावं लागतं. आपल्यामार्फत करण्यात आलेली पीक पाहणी यशस्वीरित्या पूर्ण झाली का नाही ? याची स्थिती कशी तपासावी याबद्दलची माहिती आपण या ठिकाणी पाहूयात.
काहीवेळी तांत्रिक अडचण, नेटवर्कमधील त्रुटी व अन्य कारणामुळे शेतकऱ्यांमार्फत नोंदविण्यात आलेल्या पिकांची नोंद पुढील टप्प्यामध्ये न जाता ती रद्द होते किंवा आहे त्या स्थितीत राहते. अशावेळी आपण समजू शकतो की, शेतकऱ्यांची ई-पीक पाहणी झालेली नाही. ई-पीक पाहणी केल्यापासून शेतकऱ्यांनी पुढील 48 तासानंतर पीक पाहणीची स्थिती तपासावी, त्यानंतरसुद्धा यादीमध्ये नाव दिसत नसेल, तर शेतकऱ्यांनी पिकांची नोंद परत एकवेळी करावी.
तुमची ई-पीक पाहणी यशस्वीरित्या झाली का ? स्टेटस असं चेक करा !
- e pik pahani status पाहण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला प्ले-स्टोअरवरून नवीन ई-पीक पाहणी व्हर्जन 2 हे ॲप इंस्टॉल करावं लागेल.
- त्यानंतर ई-पीक पाहणी ॲप उघडा, तुमचा संबंधित महसूल विभाग निवडा.
- महसूल विभागाची निवड केल्यानंतर ई-पीक पाहणी केली असल्यामुळे, तुमच्यासमोर खातेदार निवडा असा पर्याय दिसेल, त्याठिकाणी तुमचा खाते क्रमांक टाकायचा आहे.
- खाते क्रमांक टाकल्यानंतर सांकेतांक क्रमांक विचारला जाईल, सांकेतांक क्रमांक माहीत नसल्यास त्याठिकाणी सांकेतांक क्रमांक पाहण्यासाठी पर्याय दिलेला असेल, सांकेतांक क्रमांक टाकून Proceed वर क्लिक करा.
- त्यानंतर गावचे खातेदारांचे पीक पाहणी हा पर्याय निवडा.
- हा पर्याय निवडल्यानंतर तुमच्या गावातील सर्व शेतकऱ्यांची यादी दाखवली जाईल, त्यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केलेली असेल, त्यांचं नाव हिरव्या पट्ट्यात दिसेल आणि ज्या शेतकऱ्यांची अद्यापही ई-पीक पाहणी झालेली नसेल त्यांचं नाव पांढऱ्या पट्ट्यामध्ये दिसेल.
- याचाच अर्थ जर तुमची ई-पीक पाहणी यशस्वीरित्या झालेली असेल, तर तुमच्या नावासमोर हिरवा रंग दिसेल अन्यथा सपाट पांढऱ्या रंगात तुमचं नाव दिसेल.
- याव्यतिरिक्त अधिक माहितीसाठी संबंधित शेतकऱ्यांच्या नावापुढे एक डोळ्याचा चिन्ह दाखवलेला असेल, त्या चिन्हावर क्लिक केल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांकडून कोणकोणत्या पिकाची नोंद, कोणत्या तारखेला करण्यात आलेली आहे, याबद्दलची माहिती दर्शवली जाईल.
वरील नमूद पद्धतीने शेतकरी त्यांच्यामार्फत करण्यात आलेल्या ई-पीक पाहण्याची स्थिती म्हणजेच ई-पीक पाहणी यशस्वीरित्या झालेली आहे का हे पाहू शकतात.