सोयाबीन पेरणीसाठी योग्य वाणाची निवड : Soyabean Variety

Soyabean Variety : शेतकरी मित्रांनो, तसं बघायला गेलं तर बाजारामध्ये सोयाबीनची विविध वाण उपलब्ध आहेत; परंतु यापैकी तज्ञांकडून किंवा शासकीय कर्मचाऱ्यांकडून सल्ला देण्यात आलेल्या वाणांची माहिती आपण याठिकाणी पाहूयात.

सोयाबीन 612 : सोयाबीन 612 या वाणाची शेतकरी निवड करू शकतात. या मानाचा वैशिष्ट्य म्हणजे ज्या ठिकाणी पावसाचे प्रमाण जास्त असेल, अशा परिस्थितीत सोयाबीनच्या शेंगा जास्त काळ पाण्यात भिजल्या, तरी सुद्धा त्या फुटत नाहीत, त्याचप्रमाणे या वाहनाची सोयाबीनचे दाणे तपोरी असतात, इतर वाहनाच्या तुलनेत त्याचे वजन जास्त असल्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्नात नक्कीच वाढ होते. सोयाबीन काढणीच्या रंगात आल्यानंतर पाऊस पडतो, तशावेळी हे सोयाबीन वाण खूपच महत्त्वाची भूमिका बजावत.

फुले संगम, फुले किमया : या दोन्ही सोयाबीनच्या जातीसुद्धा महाराष्ट्रात खूपच प्रसिद्ध आहेत व मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांची फुले संगम व फुले किमया हीच निवड आहे. या दोन्ही जातीसुद्धा शेतकऱ्यांना भरघोस असं उत्पन्न मिळवून देतात.

इतर जाती : वरील वाणाव्यतिरिक तुम्ही इतर वाणाची सुध्दा निवड करू शकता. त्यासाठी तुमच्या जमिनीच्या प्रकारानुसार संबंधित कृषी सहाय्यक किंवा कृषी अधिकारी यांचा सल्ला घ्या व योग्य निर्णयानुसार सोयाबीन वाणाची निवड करून तुमच्या शेतामध्ये पेरा आणि यावर्षी वर्षापेक्षा जास्त भरघोस उत्पन्न मिळवा.

📢 सोयाबीन योग्य व्यवस्थापन, पेरणीची योग्य वेळ, बीजप्रक्रिया, पिकांमधील अंतर इत्यादीच्या माहितीसाठी येथे क्लिक करा !