Soyabean Farming : सोयाबीन एक मुख्य तेलबिया पिक असून सद्यस्थितीत महाराष्ट्र राज्यामध्ये या पिकाची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जात आहे. देशातील एकूण उत्पादनापैकी जर महाराष्ट्र राज्याचा विचार केला तर, जवळपास 40 ते 42 टक्के उत्पादन फक्त आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये घेतलं जातं. या पिकाची प्रसिद्धी फक्त महाराष्ट्र राज्यपूर्ती सीमित नसून ब्राझील, अर्जेंटिना, अमेरिका, पाकिस्तान इत्यादी देशांमध्ये सुद्धा सोयाबीन या तेलबिया पिकाच उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतलं जातं.
ही झाली सोयाबीनची प्राथमिक माहिती, सोयाबीन महाराष्ट्र उत्पादनात जरी राज्यात दुसरा येत असला, तरी काही शेतकऱ्यांच्या बाबतीत प्रती हेक्टरी क्विंटल उत्पन्नाची मर्यादा कमी-जास्त आहे. सहाजिकच शेतकऱ्यांना लागवड व मशागतीच्या पद्धतीमध्ये सुधारणा करावी लागेल, त्याचप्रमाणे पेरणी कोणत्या वेळी करावी ? बीजप्रक्रिया त्यानंतर पेरणी मधील अंतर, कोणत्या वाणाची निवड करावी ? या सर्व बाबी भरगोश उत्पन्न घेण्यासाठी तितक्याच महत्त्वाच्या आहेत. याबद्दलची थोडक्यात माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून पाहुयात.
पेरणीची योग्य वेळ : सोयाबीन पिकाच तुम्हाला चांगलं उत्पन्न मिळवायचं असेल, तर सोयाबीन पिकाची पेरणीसुद्धा योग्य वेळी होणं तितकंच महत्त्वाचा आहे. पेरणी साधारणता जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून ते जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत पर्जन्य विभागाच्या अंदाजानुसार करावी. तज्ञ म्हणजेच पंजाबराव डकसारखे व्यक्ती सांगतात की, शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी शक्यतो 26 जुलैनंतर टाळावी. त्यानंतर आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे थोडाफार पाऊस पडल्यास पेरणीसाठी शेतकऱ्यांनी घाई करू नये. आपल्या भागात किमान 75 ते 100 मिलिमीटर पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी. पावसाचं प्रमाण तुमच्या भागामध्ये किती झालेला आहे ? याचा अंदाज घेण्यासाठी तुम्ही कृषी सहाय्यक किंवा कृषी अधिकारी यांना संपर्क करू शकता.
बीजप्रक्रिया : कोणत्याही पिकामध्ये पेरणीपूर्व बीजप्रक्रिया खूपच आवश्यक असते. यामध्ये पेरणी करण्यापूर्वी बियाणांवर प्रक्रिया केली जाते, ज्यामध्ये बुरशीनाशक किंवा कीटकनाशकांची मिश्रण करून त्यानंतरच पेरणी करण्यात येते.
पिकामधील योग्य अंतर महत्त्वाचं : पिकाच्या वाढीसाठी व पिकाला पोषक घटक मिळण्यासाठी दोन रोपांमधील अंतर तज्ञांच्या सांगण्यानुसार ठराविक असणं अत्यंत महत्त्वाचा आहे. सोयाबीन पिकाचा विचार केला, तर सामान्यता सोयाबीनची पेरणी 45 बाय 5 से.मी किंवा 7.5 से.मी पाभर किंवा ट्रॅक्टरचलीत पेरणी यंत्राच्या साह्याने केली जाते. पिकामधील अंतरासोबतच पिकाची खोलीसुद्धा तितकीच महत्त्वाची. त्यामुळे पेरणी करताना बियाण जास्त खोलवर पडणार नाही याची शेतकऱ्यांनी किंवा ट्रॅक्टर चालकांनी दक्षता घ्यावी. सोयाबीन खोलीचा मापदंड पाहिला, तर सोयाबीनच बियाण 2.5 ते 3.0 से.मी खोलीपेक्षा जास्त पेरू नये, यापेक्षा जास्त खोलीवर बियाण पडल्यास उगवणाची क्षमता कमी होते; परिणामी उत्पन्न घटतो.
चांगली उत्पन्न देणारी सोयाबीनची वाण ? येथे क्लिक करून पहा !