Insurance Payment : अग्रीम पिक विमा रक्कम मिळायला सुरुवात झाली ! विमा जमा झाला की नाही कसं बघायचं ?

Insurance Payment : महाराष्ट्र राज्यातील ऑगस्ट महिन्यात सततचा पावसाचा खंड पडल्यामुळे पिकाच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणावर घट झाली. पिकातील उत्पन्नाची घट पाहता राज्यातील जवळपास सर्व जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी यांच्याकडून शेतकऱ्यांना आगाऊ पिक विमा रक्कम मिळावी, यासाठी निवेदन देण्यात आली होती. या निवेदनाला अनुसरून शेतकऱ्यांना अग्रीम पिक विमा वितरित करण्याबाबतचे आदेश देखील विमा कंपनीला संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी यांच्याकडून देण्यात आल्यानंतर सर्व जिल्ह्यांमध्ये अग्रीम पिक विमा मंजूर करण्यात आला.

अग्रीम पीक विमा वाटप | Insurance Payment

माननीय जिल्हाधिकारी यांच्या आदेशाची दखल घेत महाराष्ट्र राज्यातील काही जिल्ह्यातील विमा कंपनीकडून पीक विमा अग्रीम रक्कम Insurance Payment शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यास सुरुवात झाली आहे. यामध्ये सामान्यतः परभणी, सांगली, बीड, कोल्हापूर इत्यादी जिल्ह्यांचा समावेश असून या जिल्ह्यामध्ये विमा कंपनीकडून 9 नोव्हेंबर पासून विमा रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात टाकण्यास सुरुवात केली आहे.

विमा कंपनीकडून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती अग्रीम पिक विम्याची रक्कम जमा केली जात आहे; परंतु यामध्ये काही शेतकऱ्यांकडून तक्रार मिळाल्यानंतर असं लक्षात आलं की, काही शेतकऱ्यांना पिक विमा रक्कम मिळत नाही. याविषयी विमाकंपनी प्रतिनिधी यांच्याशी संपर्क साधल्यानंतर खालीलप्रमाणे माहिती मिळाली.

पिक विमा कोणत्या खात्यामध्ये जमा होत आहे? (Insurance Payment)

पिक विमा अग्रीम रक्कम ही शेतकऱ्यांच्या आधार सलग्न म्हणजेच आधार लिंक बँक खात्यामध्ये जमा होत आहे, त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी विमा अर्ज भरताना दिलेल्या बँक खात्यामध्ये विम्याची रक्कम जमा न होता, त्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये रक्कम जमा होत आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांनी पीक विम्याचा अर्ज भरत असताना जो बँक खाते क्रमांक दिला होता; त्याऐवजी त्यांच्या आधार कार्डला जो बँक खाते क्रमांक लिंक आहे, म्हणजेच आधारशी संलग्न जो बँक खाते क्रमांक लिंक आहे. त्या बँक खात्यामध्ये जाऊन पिक विम्याची आग्रीम रक्कम तपासावी.

आधारला कोणती बँक लिंक आहे ? कसं पाहावं ?

आपल्या आधारकार्डशी कोणती बँक लिंक आहे. हे तुम्ही घरबसल्या तुमच्या मोबाईलवर तपासू शकता, त्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून आधार संलग्न बँक खात्याची खात्री करून घ्या.

Leave a Comment