आधार कार्डला कोणती बँक लिंक आहे, कसं पाहावं ? : Aadhaar Bank Link Status

शेतकरी मित्रांनो, आता आपल्याला शासनाकडून देण्यात येणाऱ्या विविध प्रकारच्या अनुदानाची रक्कम बँक खात्यात न मिळता आपल्या आधार क्रमांकाची सलग्न असणाऱ्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. त्यामुळे आपल्या आधारकार्डला कोणती बँक लिंक आहे, हे तपासणी खूपच महत्त्वाचं आहे. खालील पद्धतीचा अवलंब करून आपण आपल्या आधार क्रमांकाची कोणती बँक लिंक आहे ? हे एकदम सोप्यापद्धतीने पाहू शकतो.

1. सर्वप्रथम तुम्हाला खाली देण्यात आलेल्या आधारच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल :- येथे क्लिक करा

2. त्यानंतर तुमच्यासमोर लॉगिन पर्याय दिसेल त्याठिकाणी तुमचा 12 अंकी आधार क्रमांक टाकून खाली देण्यात आलेला Captcha कोडे टाकावा लागेल.

3. आधार क्रमांक व कॅपचा कोड टाकल्यानंतर Send OTP या पर्यायावर क्लिक करा. आता तुमच्या आधार क्रमांकाची लिंक असलेल्या मोबाईलवर OTP पाठविण्यात येईल. तो ओटीपी त्याठिकाणी टाकून लॉगिन या पर्यायावर क्लिक करा.

4. लॉगिन केल्यानंतर तुमच्यासमोर खालील प्रमाणे विविध पर्याय दिसतील, त्यामधील Bank Seeding Status हा पर्याय निवडा.

5. अंतिम टप्प्यात मागील पर्याय निवडल्यानंतर तुमच्यासमोर खालीलप्रमाणे तुमच्या आधारशी संलग्न असणाऱ्या बँकेचे नाव दाखवले जाईल व सोबतच तुम्ही त्या बँकेचा खाता क्रमांक आधारशी कोणत्या तारखेला लिंक केलेला आहात, याबद्दलची तारीख दाखवण्यात येईल.