Crop Loan : शेतकऱ्यांना आता गावातच 0% व्याजदराने कर्ज मिळणार; शासनाचा निर्णय

Crop Loan : शेतकऱ्यांना खरीप किंवा रब्बी हंगाम सुरू झाल्यानंतर सर्वात मोठी समस्या भेडसावते ती म्हणजे पीक कर्जाची; कारण पीककर्ज घेण्यासाठी शेतकऱ्यांना खूप आटापिटा करावा लागतो. त्यासाठी लागणारी विविध कागदपत्र, बँक कर्मचाऱ्यांमार्फत मदत न करण्याची प्रवृत्ती, महसूल विभागाकडील कागदपत्र या सर्व गोष्टीमुळे शेतकरी कंटाळून जातो. काही शेतकरी तर अशा अडचणी पाहता आपल्याला पीककर्ज मिळणारच नाही, म्हणून त्याकडे दुर्लक्ष करतात.

वरील सर्व बाबीचा विचार करता शासनाकडून आता एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता शेतकऱ्यांना त्यांच्या स्वतःच्या गावातच शून्य टक्के व्याजदराने कर्ज मिळणार आहे. यासंदर्भात महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल रमेश बैस इतर प्रसार माध्यमातून माहिती दिली. या संदर्भातील आपण सविस्तर माहिती या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.

छत्तीसगड राज्याचा विचार केला तर, त्या राज्यातील शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजदराने पीककर्ज उपलब्ध करून दिले जातात, कर्ज उपलब्ध करून देण्याची सुविधा सुद्धा गावातच दिली जाते. याच धरतीवर महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना गावातच कर्जाची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी राज्यपालाद्वारे शासनाकडे केली जाणार आहे, यासाठी राज्य शासनाकडून शेतकऱ्यांसाठी नवीन योजना सुरू करण्यात यावी असे प्रस्तावमध्ये नमूद करण्यात आले आहे.

📣 हे पण वाचा : कुसुम सोलर पंप योजनेचा नवीन कोटा येणार का ?

राज्यपालाकडून शासनाला देण्यात आलेला हा निर्णय जर मान्य झाला, तर शेतकऱ्यांना लवकरच शासनमान्य बँकेतून गावात सोसायटीची स्थापन करण्यात येईल व त्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शून्य टक्के कर्जाची सुविधा गावातच उपलब्ध होईल. सोबतच कर्जाची वसुली, शेतकऱ्यांना कर्जासाठी करावी लागणारी पायपीट इत्यादी बाबी सोयीस्कर होऊन शेतकऱ्यांचा वेळ वाचेल; परिणामी बँकांना सुद्धा सोयीस्कर पडणार आहे.

शेतकरी मित्रांनो, राज्य शासनाकडून शेतकऱ्यांसाठी गावातच पीक कर्जाची सुविधा जर उपलब्ध करून देण्यात आली आणि या संदर्भातील शासन निर्णय निर्गमित करण्यात आला, तर याबद्दलची आम्ही सविस्तर माहिती आमच्या वेबसाईटवरती लवकरच देऊ, त्यामुळे अशाच नवनवीन योजनांसाठी व अपडेट मिळवण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट देत राहा, धन्यवाद !

Leave a Comment