Agriculture Loan : शेतकऱ्यांना आता फक्त 5 मिनिटात मिळणार कृषी कर्ज ! नाबार्ड आणि आरबीआय यांच्यात झाला करार

शेतकऱ्यांना वेळीप्रसंगी पैशाची गरज भासल्यास शासनाकडून कृषी कर्ज उपलब्ध करून देण्यात येतात; परंतु यासाठी लागणारा कालावधी खूपच असल्यामुळे बहुतांशी शेतकऱ्यांकडून कर्जाची ही प्रक्रिया नाकारली जायची, पण आता शेतकऱ्यांना बँकेकडून कर्ज घेण्यासाठी फक्त पाच मिनिटातच सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी एक नवीन करार करण्यात आलेला असून याबद्दलची माहिती आपण याठिकाणी पाहणार आहोत.

कृषी कर्ज मिळणार 5 मिनिटात.

शेतकऱ्यांना पूर्वी कृषी कर्जासाठी कमीत कमी 3 ते 5 आठवडे वाट पाहावी लागत असत; परंतु आता यासाठी राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक (NABARD) आणि रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या (RBI) शाखा आरबीआयएच (RBIH) सोबत करार करण्यात आलेला असून यामुळे शेतकऱ्यांना आता काही मिनिटातच कृषी कर्ज उपलब्ध होणार आहे.

या कराराअंतर्गत नाबार्डकडून विकसित करण्यात आलेल्या ई-केसीसी लोन (e-KCC Loan) प्लॅटफॉर्म रिझर्व बँकेच्या पूर्ण मालकीच्या रिझर्व बँक इनोवेशन हबच्या पब्लिक टेक प्लॅटफॉर्म फॉर फ्रॅक्शनलेस क्रेडिट (PTPFC) शी जोडले जाईल. नाबार्डने सहकारी बँका आणि प्रादेशिक ग्रामीण बँकांसाठी डिजिटल किसान क्रेडिट कार्ड (KCC) कर्ज प्रक्रिया सुलभ करण्यासाठी हे क्रेडिट सिस्टम प्लॅटफॉर्म तयार केले आहे.

📢 शेतकऱ्यांना ही बँक देणार 7 लाखापर्यंत कर्ज, योजनेत मोठ बद्दल

या करारामुळे ॲग्री लोन प्रक्रियेतील अनेक समस्या दूर होतील आणि शेतकऱ्यांना त्वरित कर्ज मिळू शकेल. यामुळे नाबार्डचे ग्रामीण समृद्धीला चालना देण्याचे मिशन पुढे जाईल, अशी माहिती नाबार्डचे अध्यक्ष शाजी के. व्ही यांच्यामार्फत देण्यात आली आहे.

कर्ज प्रक्रियेत सुधारणा

नाबार्डचे अध्यक्ष आणि रिझर्व्ह बँके ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश बन्सल यांच्याकडून सांगण्यात आले की, “या करारामुळे कर्जाची प्रक्रिया सुरळीत होईल आणि देशातील जवळपास 12 कोटी शेतकऱ्यांसाठी कर्ज वाटपाचा कालावधी तीन-चार आठवड्यांवरून केवळ 5 मिनिटांवर येईल.”

नाबार्ड आणि (आरबीएच) RBH यांच्यातील करारामुळे कर्जाची प्रक्रिया अधिक कार्यक्षम आणि पारदर्शक बनेल. शेतकऱ्यांना आवश्यक कागदपत्रे आणि माहिती त्वरित ऑनलाईन दाखल करता येईल. कर्ज मंजुरीसाठी लागणारा वेळ मागील वर्षाच्या तुलनेत खूपच कमी होणार आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या कर्जाची अद्यावत माहिती त्वरित मिळेल.

Leave a Comment