Legal Heir Certificate : वारस प्रमाणपत्र जनसामान्य नागरिकांसाठी, शेतकऱ्यांसाठी व इतर विविध बाबींसाठी महत्त्वाचं प्रमाणपत्र मानलं जातं. बँकेमध्ये आपल्याला आपल्या कुटुंबातील व्यक्तीच्या मृत्यूपश्यात वारस प्रमाणपत्र का मागितलं जातं ? वारस प्रमाणपत्र देण आवश्यक आहे का ? याबद्दलची थोडक्यात व महत्त्वाची माहिती आपण सदर लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.
वारस प्रमाणपत्र
उदाहरणासाठी समजा एका मुलाच्या आईच्या नावाने बँकेत खात आहे. आई वडिलांना तो एकुलता एक मुलगा असून काही वर्षांपूर्वी किंवा 2005 मध्ये त्याचे वडील वारले. आता आई देखील वारली त्यांच्या खात्यावरील पैसे मुलाच्या नावाने करण्यासाठी बँक वारस प्रमाणपत्र मागत ! हे कितपत योग्य आहे ? वारस प्रमाणपत्र देणे आवश्यक आहे का ? वारस प्रमाणपत्र न देतासुद्धा मृत व्यक्तींच्या खात्यावरील रक्कम आपल्याला मिळू शकेल का ?
भारतीय वारसा कायद्यामधील तरतुदीनुसार एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्या व्यक्तीच्या मालमत्तेवर तिच्या वारसदारांचा अधिकार असतो. खरंतर अशा परिस्थितीत आपल्या मागील वारसदारांना सोयीस्कर ठरावं, म्हणून तत्पूर्वीच मृत्युपत्र तयार केल पाहिजे. ज्यामध्ये आपल्या पश्चात आपल्या मालमत्तेचं वाटप कशाप्रकारे होईल? याची व्यवस्था करता येते. अशावेळी आपला वारसा हक्क दाखवण्यासाठी किंवा साबित करण्यासाठी न्यायालयात सर्व वारसांना अर्ज करून वारसा हक्क प्रमाणपत्र मिळवाव लागतं.
बँक खात्यासंदर्भात वारस प्रक्रिया
बँकेच्या बाबतीत आपल्यानंतर कोणाला पैसे मिळावेत ? याची नोंद करण्याची सुविधा बँकेकडून पूर्ववत देण्यात आलेली आहे. त्याला Nomination किंवा Nomine असं म्हटलं जातं. बँकेच नवीन खातं काढत असताना या सर्व बाबी त्याठिकाणी नमूद कराव्या लागतात. एक साधा फॉर्म भरून आपल्याला नॉमिनेशन करता येतं आणि नंतरच्या बँकेतील अनेक अडचणी टाळता येतात. जर आपला नॉमिनी नेमलेला असेल, तर आपल्या पश्यच्यात बँकेकडून खात्यावरील शिल्लक रक्कम सहजरीत्या वारसदाराला अदा केली जाते.
मयातांच्या खात्यावर असलेली रक्कम खूपच कमी असेल, तर अशा परिस्थितीत वारसा हक्काबद्दल तितका मोठा प्रश्न निर्माण होत नाही. थोडीफार पडताळणी व एक साधा अर्ज भरून वारसा हक्क सांगणाऱ्या वारसदारांच्या ओळखीच्या संबंधाची कागदपत्र सत्यप्रत केली जातात व वारसदारांना लाभ दिला जातो; परंतु जर मयतांच्या खात्यावर मोठी रक्कम असेल, तर मात्र बँकेकडून आपल्याला वारसा हक्क प्रमाणपत्राची मागणी केली जाते. यासाठी कोर्टाकडून वारसा हक्क प्रमाणपत्र मिळवावा लागतो. त्यामुळे सर्व वारसदारांनी संयुक्तपणे अर्ज करून बँक खात्यावरील शिल्लक असणारी रक्कम मिळवू शकतात.
📣 सातबारा उताऱ्यावरील वारस नोंद घरबसल्या कशी करावी ?
मित्रांनो आम्ही आशा करतो, वारस प्रमाणपत्र काय ? नॉमिनेशन, मृत्युपत्र या विविध बाबींचा थोडक्यात आढावा तुम्हाला भेटलाच असेल, कारण प्रत्येकांना या परिस्थितीमधून सामोरे जावे लागते, परिणामी काहीवेळी माहिती नसल्याकारणाने गफलत होते. त्यामुळे सदरची थोडक्यात महत्त्वाची माहिती देण्याचा प्रयत्न याठिकाणी आमच्याकडून करण्यात आला आहे.