यंदाच्या खरीप हंगामासाठी मृगबहार निघालेला असून राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये पावसाने हजेरी सुद्धा लावलेली आहे. शेतकऱ्यांमार्फत बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर धांधल सुरू आहे. बियांची खरेदी, कीटकनाशक खरेदी, खताची खरेदी शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर केली जात आहे. यामध्ये शेतकऱ्यांना हमखास पडणारा प्रश्न म्हणजे ? यावर्षी बियाचं कोणतं वाण वापरावं म्हणजे आपल्याला चांगलं उत्पन्न मिळेल? काही शेतकरी मागील वर्षी धरण्यात आलेला बियाणं चालू वर्षासाठी वापरतात, तर काही शेतकरी बाजारातून नवीन बियाण खरेदी करतात.
इतर पिकांच्या तुलनेत सोयाबीन या पिकाच पेरणी प्रमाण पाहिलं, तर जवळपास 60 ते 70 टक्के आहे; कारण सोयाबीन हे पीक कमी कालावधीत येणार व भरघोश उत्पन्न देणारं पीक असल्यामुळे बहुतांश शेतकऱ्याकडून या पिकाची पेरणी मोठ्या प्रमाणावर केली जाते. यंदाच्या पेरणीसाठी सोयाबीनच नेमकं कोणत बियाणे म्हणजेच वाण वापरावं, या संदर्भातील थोडक्यात माहिती या लेखाच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत.
⭕ सूचना : आमच्याकडून शेतकऱ्यांना कोणत्याही सोयाबीन पिकाच्या वाणासाठी शिफारस केली जात नाही. शेतकऱ्यांनी स्वतः विचार करून व संबंधित कृषी सहाय्यक व कृषी अधिकारी यांचा सल्ला घेऊन जमिनीच्या प्रकारानुसार योग्य त्या वाणाची निवड करून पेरणी करावी. आमच्यामार्फत देण्यात आलेली माहिती ही विविध माध्यमातून गोळा करून तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात आलेली आहे.

1 thought on “चांगली उत्पन्न देणारी सोयाबीनची वाण कोणती ? एकरी 15-20 क्विंटल : Soyabean Variety”