मोनोपार्क बायो फेशियल सोलर पॅनल (Solar Panel) सध्यास्थितीत नवीन तंत्रज्ञानासह तयार करण्यात आलेले सोलर पॅनल असून यामध्ये पुढच्या व मागच्या दोन्ही भागातून वीज निर्मिती केली जाऊ शकते. अश्या प्रकारची 4 सोलर पॅनल एकत्र ठेवल्यास आपल्याला दररोज 6-8 युनिटपर्यंत सहजासहजी वीज निर्मिती करता येते.
शासनाकडून अनुदान मिळणार
भारतात सौर ऊर्जेला चालला देऊन इंधन बचतीसाठी नवीन आणि नाविन्यकरण ऊर्जा मंत्रालय विभागाकडून सोलार रूफ टॉप योजना सुरू करण्यात आली. महावितरणच्या यादीमधील समाविष्ट असलेल्या कोणत्याही विक्रेत्याकडून अर्जदार लाभार्थी आपल्या घराच्या छतावर Solar Panel लावू शकतात आणि त्यासाठी शासनाकडून सबसिडीसाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात. सोलार रूफ टॉप बसविण्यात आल्यानंतर विक्रेत्याकडून पुढील पाच वर्षासाठी देखभाल करण्याची जबाबदारीसुद्धा संबंधित करारातमध्ये समाविष्ट असेल.
Solar Panel साठी 40% Subsidy
सोलर पॅनलसाठी देण्यात येणारी सबसिडी सामान्यत: किलोवॅटच्या प्रमाणानुसार देण्यात येईल, ज्यामध्ये जर तुम्हाला 3 किलोवॅट क्षमतेचे सोलर रुफटॉप पॅनल बसवायचे असेल, तर शासनाकडून तुम्हाला 40 टक्क्यांपर्यंत सबसिडी देण्यात येईल. याउलट, जर तुम्ही 10 किलोवॅटपर्यंतचे Solar Panel बसवत असाल, तर तुम्हाला 20 टक्के सबसिडी देण्यात येईल.
एकंदरीत एकूण किती खर्च येईल ?
समजा, तुम्हाला तुमच्या घरावरील छतावर 2 किलोवॅटचा सोलर पॅनल बसवायचा आहे, तर अशा परिस्थितीत कमीत कमी किंमत Solar Panel बसविण्यासाठी खर्च 1.20 लाख रु. इतका येऊ शकतो. यासाठी शासनाकडून 40% सबसिडी दिली जाईल, म्हणजेच लाभार्थ्यांना एकंदरीत 2 किलोवॅटचा सोलर पॅनलचा खर्च 72,000 रुपयापर्यंत येऊ शकतो. तुम्हाला याचप्रमाणे तुमच्या क्षमतेनुसार हव्या असलेल्या सोलार पॅनलचा अंदाज धरून खर्चाची गणना करायची आहे. सोलर पॅनल घेतल्यानंतर कोणत्याही सोलार पॅनलचं साधारणतः आयुष्य जवळजवळ 25 वर्ष असत.
अर्ज कसा करावा ?
- सोलर रुफटॉप पॅनल इन्स्टॉल करण्यासाठी तुम्हाला Solar Panel साठी शासनाकडून देण्यात आलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल, त्यासाठी येथे क्लिक करा.
- यानंतर तुम्हाला सोलर रूफटॉपसाठी ऑनलाईन अर्ज करावा लागेल. तुमच्यासमोर आणखी एक नवीन पेज उघडेल, त्याठिकाणी तुमच्या राज्यानुसार पर्याय निवडा, त्यानंतर एक नवीन फॉर्म उघडेल, त्या ठिकाणी तुमची सर्व मूलभूत माहिती भरून घ्या.
- माहिती भरून घेतल्यानंतर अंतिम अर्ज सबमिट करण्यापूर्वी अर्जाची एकवेळेस संपूर्ण काळजीपूर्वक तपासणी करून, त्यानंतरच अंतिम अर्ज सबमिट करा.
- अर्ज प्रक्रिया संपूर्ण होऊन सोलर पॅनल बसवल्यानंतर पुढील 30 ते 45 दिवसाच्या आत तुमच्या बँक खात्यावरती सबसिडीची रक्कम जमा करण्यात येईल. विहित कालावधीत रक्कम जमा न झाल्यास संबंधित कार्यालयाशी अर्जदारांनी त्वरित संपर्क साधावा.