स्लरी फिल्टर संयंत्रासाठी शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदान मिळणार; या तारखेपर्यंत अर्ज करा : Slurry Filter Subsidy Scheme

महाराष्ट्र राज्य मुख्यत्व कृषीप्रधान राज्य म्हणून ओळखल जात. राज्यामध्ये शेतकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आपल्याला आढळून येते. शेतकऱ्यांना शेती करत असताना जास्तीत जास्त उत्पन्न मिळवण्यासाठी जमीन सुपीक करणे अत्यंत गरजेचं असतं. जमिनीची सुपीकता कशा पद्धतीने वाढवता येईल ? यासाठी कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना नवनवीन माहिती दिली जाते. जमीन सुपीकता वाढवण्यासाठी लातूर जिल्हा परिषदकडून एक महत्वपूर्ण पाऊल उचलण्यात आल आहे.

जिल्हा परिषद स्लरी फिल्टर अनुदान योजना

रासायनिक खत व कीटकनाशकांचा वापर कमी व्हावा, जमिनीतील सेंद्रिय कर्बंची क्षमता वाढून जमिनीची सुपीकता वाढावी. याकरिता शेतकऱ्यांनी सेंद्रिय खतांचा मोठ्या प्रमाणावर वापर करणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी सुधारित कृषी पद्धतीच्या प्रात्यक्षिक अंतर्गत शेतकऱ्यांसाठी स्लरी फिल्टरचे प्रात्यक्षिक आयोजित करण्याचा महत्त्वकांक्षी निर्णय लातूर जिल्हा परिषदे कडून घेण्यात आलेला आहे. इतकंच नाही तर जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून शेतकऱ्यांना स्लरी फिल्टर खरेदीसाठी 50 टक्के अनुदान डीबीटी प्रणालीच्या माध्यमातून देण्यात येणार आहे.

जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येणाऱ्या या अनुदान योजनेत स्लरी फिल्टर करिता अनुसूचित जाती अनुसूचित जमाती शेतकरी व महिला वर्गांना प्राधान्य देण्यात येणार असून शेतकऱ्यांना यामध्ये स्लरी फिल्टर बसवण्यासाठी जवळपास 50 टक्के अनुदान देण्यात येईल यासाठी शेतकऱ्यांनी शेवटच्या तारखेपर्यंत जास्तीत जास्त प्रमाणात अर्ज करावेत असे आवाहन जिल्हा परिषदे कडून करण्यात आले आहे.

अनुदानाचा लाभ कोणाला मिळणार?

स्लरी फिल्टर अनुदान योजना सध्या स्थितीत फक्त लातूर जिल्हा परिषद अंतर्गत विशेष शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येत आहे. त्यामुळे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सदर योजनेचा लाभ घेऊन अनुदान मिळवता येणार आहे. शेतातील जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी शेतकऱ्यांना मिळणारी जिल्हा परिषदेकडूनची ही सुवर्णसंधी जणू !

शेतकऱ्यांमार्फत अर्ज करण्यात आल्यानंतर ज्यावेळी पात्र शेतकऱ्यांची निवड करण्यात येईल तेव्हा शेतकऱ्यांनी एक महिन्याच्या आत स्लरी फिल्टर खरेदी करावे लागेल त्यानंतर संयंत्र सक्षम तपासणी संस्थांनी परीक्षण करून निकषानुसार संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर अनुदानाची रक्कम वितरित करण्यात येईल.

अर्जासाठी आवश्यक कागदपत्र

  • शेतजमिनीचा सातबारा उतारा
  • शेतजमिनीचा आठ-अ उतारा
  • शेतकऱ्यांचा आधार कार्ड
  • बँक पासबुक झेरॉक्स
  • जातीचा दाखला (आवश्यक असल्यास)
  • दिव्यांग प्रमाणपत्र(आवश्यक असल्यास)

अर्ज कसा करावा ? येथे क्लिक करून संपूर्ण माहिती पहा !

Leave a Comment