Slurry Filter Application Process : स्लरी फिल्टर अनुदानासाठी अर्ज कसा करावा ?

लाभार्थ्यांना स्लरी फिल्टर अनुदानाचा लाभ मिळवण्यासाठी संबंधित पंचायत समिती कार्यालयाकडे विहित मुदतीत म्हणजेच 15 सप्टेंबर 2023 पूर्वी संपूर्ण आवश्यक कागदपत्रासह अर्ज सादर करावयाचा आहे, असं आवाहन जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी यांच्यामार्फत करण्यात आलं आहे. लाभार्थ्यांनी प्रवर्गनिहाय आपल्या जातीच्या दाखल्यासहित पंचायत समितीकडे अर्ज करायचा आहे.

निवड प्रक्रिया कशी ?

लाभार्थ्यांकडून अर्ज करण्यात आल्यानंतर, जर अर्जाची संख्या मोठ्या प्रमाणावर असेल तर अशा परिस्थितीत लक्षांकनुसार सोडत पद्धतीने लाभार्थ्यांची निवड पंचायत समिती स्तरावर करण्यात येईल. निवड झालेल्या लाभार्थी शेतकऱ्यांना आधार लिंक असलेल्या बँक खात्यावर विविध प्रणालीच्या माध्यमातून अनुदानाची रक्कम वितरित करण्यात येईल.