Business Idea : शेळीपालन व्यवसाय करण्यासाठी केंद्रसरकारकडून 35 टक्क्यापर्यंत अनुदान देण्यात येतं. केंद्र शासनासह राज्य शासनाकडूनसुद्धा शेळीपालनासाठी सबसिडी दिली जाते. इतर राज्यामध्ये जर हरियाणा राज्याचा विचार केला, तर त्याठिकाणी तब्बल 90% पर्यंत सबसिडी शेळीपालनासाठी देण्यात येते. आणखी एक महत्त्वाची संस्था म्हणजे नाबार्ड. नाबार्डकडून शेळीपालनासाठी सर्वात जास्त अनुदान देण्यात येतात. जर तुम्ही या व्यवसायासाठी इच्छुक असाल, तर नक्कीच या व्यवसायाकडे वळून वेळीच संधीचा लाभ घ्यावा.