उमंग ॲपवरून सातबारा असा डाऊनलोड करा !

Umang App Saat Bara Download Process in Marathi : शासनाकडूनच्या नवीन सुविधांमध्ये जर तुम्हाला उमंग ॲपवरून तुमच्या शेतजमिनीचा सातबारा डाऊनलोड करायचा असेल, तर तुम्हाला खालीलप्रमाणे प्रक्रिया करावी लागेल.

  • सर्वप्रथम गुगल प्ले स्टोरवरून शासकीय उमंग ॲप डाऊनलोड करा.
  • ॲप डाऊनलोड केल्यानंतर उमंग ॲप उघडा, त्यानंतर तुम्ही जर नवीन असाल, तर त्याठिकाणी तुमची नोंदणी करून घ्या.
  • नोंदणी करताना तुमचा मोबाईल क्रमांक, ई-मेल आयडी, आधार कार्ड इत्यादी माहिती टाकावी लागेल, त्यानंतर तुमचा युजर आयडी, पासवर्ड म्हणजेच लॉगिन तयार होईल.
  • सर्व प्रक्रिया पूर्ण करून लॉगिन केल्यानंतर तुमच्या डॅशबोर्डला Services हा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.
  • त्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या शेतजमिनीचा सातबारा डाऊनलोड (७/१२) करण्यासाठीचा पर्याय दिसेल त्या पर्यायावर क्लिक करा.
  • आता सर्वप्रथम तुमचं राज्य निवडा त्यानंतर जिल्हा, तालुका आणि गाव अश्याप्रकारे अनुक्रमे पर्याय निवडल्यानंतर आता तुमचा सातबारा क्रमांक किंवा गट क्रमांक टाका.
  • डिजिटल सातबारा डाऊनलोड करण्यासाठी तुम्हाला 15 रु. पेमेंट ऑनलाईन पद्धतीने कराव लागणार आहे, त्यासाठी तुम्ही पहिलेच तुमच्या उमंग ॲपच्या वॉलेटमध्ये रक्कम जमा करून ठेवू शकता.

अशा पद्धतीने उमंग ॲपच्या माध्यमातून तुम्ही फक्त 05 ते 10 मिनिटांमध्ये तुमच्या मोबाईलवर तुमच्या शेतजमिनीचा सातबारा डाउनलोड करू शकता. सातबारा डिजिटल स्वरूपातील असल्यामुळे या सातबाऱ्यावर कोणत्याही अधिकाऱ्याची सही अथवा शिक्याची आवश्यकता भासत नाही, त्याचप्रमाणे हा सातबारा शेतकरी कोणत्याही शासकीय कामासाठी वापरू शकतात.