आता तुमच्या मोबाईलवर ठेवा तुमचा रेशनकार्ड ! Ration Card Update Maharashtra

Ration Card : येणाऱ्या काळात शिधापत्रिकाधारक ग्राहकांच्या हातात जुन रेशनकार्डच पुस्तक मिळणार नाही, तर याउलट थेट रेशनकार्ड ग्राहकांच्या कुटुंबातील सर्व व्यक्तींच्या नोंदी घेतल्या जाणार आहेत. त्यामुळे ग्राहकांना ऑनलाईन रेशनकार्ड मिळणार आहे. अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या या अद्यावत तंत्रज्ञानामुळे रेशन कार्ड ग्राहकांना पीडीएफ स्वरूपात मोबाईलवर ठेवता येणार आहे.

Ration Card Pdf Maharashtra

या रेशनकार्डवर कुटुंबातील संपूर्ण व्यक्तींची वैयक्तिक व इतर माहिती उपलब्ध असणार आहे, त्यावर प्रत्येकांचा आधार नंबर ही नोंदविला जाईल. त्याचप्रमाणे त्याकार्डवर डिजिटल स्वाक्षरीसह किंवा क्यूआर कोडसुद्धा उपलब्ध असेल. या नवीन रेशन कार्डमध्ये कुठल्या प्रकारच्या नोंदी आहेत, किती किलोचा कोटा ग्राहकाला मंजूर झाला आहे, इत्यादी संपूर्ण माहिती रास्तभाव दुकानदाराला सहज मिळवता येणार आहे.

एकंदरीत डिजिटल धोरणांचा सर्वांनाच फायदा होणार असून या डिजिटल रेशनकार्डची अंमलबजावणी संपूर्ण राज्यभरात लवकरच सुरू करण्यात येईल. प्रायोगिक तत्त्वावर काही जिल्ह्यांमध्ये अद्यावत रेशनकार्ड वाटप करण्यात आलेले आहेत. त्यामुळे लवकरच सर्व रेशनकार्ड धारकांना या नवीन कार्डच वाटप केलं जाईल. सोबतच त्यांना रेशनकार्ड पीडीएफ त्यांच्या मोबाईलमध्ये साठवून ठेवता येईल.

नवीन ग्राहकांना मिळणार रेशनकार्ड

ई-रेशनकार्डची योजना 1 ऑगस्टपासून लागू करण्यात आलेली असून यामध्ये सुरुवातीला नवीन कुटुंबाच्या नोंदी करणाऱ्या ग्राहकाला जुना रेशनकार्ड न देता ई-रेशनकार्ड दिला जाणार आहे. त्यावर 12 अंकी नंबर असेल आणि शासकीय शिक्कासुध्दा असेल. एकूणच ई-रेशनकार्डची संकल्पना खूपच चांगली असून याचा सर्वांना नक्कीच लाभ होणार आहे.

ई-रेशनकार्ड कधीपासून मिळणार?

1 ऑगस्ट पासून सदर योजनेची अंमलबजावणी करण्याच्या सूचना संबंधित पुरवठा विभागाला देण्यात आलेल्या असून ऑनलाईन रेशनकार्डची पीडीएफ ग्राहकांना सहज उपलब्ध होणार आहे. यावर कुटुंबातील संपूर्ण सदस्यांची नावं, संपूर्ण माहिती उपलब्ध असेल, ज्यामुळे शिधावाटप सोयीस्कर होईल.

सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील ई-रेशनकार्ड नवीन संकल्पना सुरू करण्यात येत आहे, यावरूनच शिधापत्रिकाधारक ग्राहकांना धान्य मिळेल. नाव नोंदविणे, कमी करणे, धान्य मिळविणे या सर्व प्रक्रिया रेशन कार्डधारकांना आता सहज व सोप्या पद्धतीने पूर्ण करता येणार आहे. तूर्त नवीन रेशनकार्ड धारकांसाठी ही योजना राबविली जात आहे, अशी माहिती विविध जिल्ह्याच्या पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनमार्फत देण्यात आली.

Leave a Comment