Government Subsidy : शेतीसोबत हे जोडधंदा करा आणि मिळवा 50 लाख रुपयापर्यंत अनुदान या योजना शेतकऱ्यांसाठी ठरतील वरदान !

Government Subsidy : शेती ही संपूर्णतः निसर्गावर अवलंबून असल्यामुळे शेतकऱ्यांकडून इतर जोडधंदा किंवा शेतीपूरक व्यवसाय करण अत्यंत महत्त्वाचं आहे. शेतकरी शेतीसोबत अनेक वर्षापासून विविध जोडधंदे करत आलेला आहे. यामध्ये प्रामुख्याने पशुपालन हा व्यवसाय पूर्वपार चालत आलेला असून यामध्ये कुक्कुटपालन, शेळीपालन, वराहपालन इत्यादी विविध पालनांचा समावेश होतो. सदर लेखाच्या माध्यमातून आपण अश्याच काही शेतीपूरक जोडधंद्याबद्दलची माहिती पाहणार आहोत. ज्याचा योग्य उपयोग केल्यास शेतकरी चांगला नफा मिळवू शकतात.

शेतीसोबत इतर जोडधंदा

शेतकऱ्यांच्या शेतीचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या हेतून राज्य शासनाकडून विविध योजना सुरू करण्यात आलेल्या आहेत. ज्यामध्ये पशुपालनासाठी अनुदान दिलं जातं. वराहपालन तसेच ससेपालन, बटेरपालन इत्यादी ही सर्व जोडधंदे शेतकऱ्यांना शेतीसोबत करता येतात. शेतीसोबत केल्या जाणाऱ्या या जोडधंद्याचे महत्त्व शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून खूपच महत्त्वाचे असते. कारण यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे उत्पन्न दुपटीन वाढवता येत.

सदर पशुधन अभियानाच्या माध्यमातून अनुदान स्वरूपात शेतकऱ्यांना मदत करण्यात येते व शेतकऱ्यांना जोडधंदा करण्यासाठी लागणारी साहित्य व इतर महत्त्वाच्या बाबी सुलभरीत्या उपलब्ध करून दिल्या जातात. आपण महाराष्ट्र शासनाचा विचार केला, तर महाराष्ट्र शासनाकडून पशुपालन व्यवसायाला चालना देण्याकरिता विविध योजना राज्यात राबविण्यात येतात यापैकीच एक महत्त्वाची योजना म्हणजे राष्ट्रीय पशुधन अभियान योजना होय. सदर अभियानामध्ये 40% अनुदानावर शेळी, कुक्कुटपालन व वराहपालन व्यवसाय उभा करण्यासाठी अनुदान उपलब्ध करून देण्यात येतं, याबाबतीत आपण थोडक्यात माहिती पाहूयात.

कुक्कुटपालनासाठी अनुदान स्वरूप

या अभियानांतर्गत शेतकऱ्यांना जोडधंदा करण्यासाठी कुक्कुटपालनामध्ये 1000 मासल पक्षी, दोन शेड त्याचप्रमाणे अंडी उबवणी यंत्र असा 50 लाखापर्यंतचा प्रकल्प उभा करण्याची संधी देण्यात येते. यामध्ये 50% अनुदान व 10 टक्के स्वतःचा हिस्सा असणार आहे. शेतकरी जर यासाठी इच्छुक असतील, तर संबंधित विभागाकडे किंवा ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकतात.

शेळी गटाकरिता अनुदान स्वरूप

खेड्यापाड्यातील शेतकऱ्यांचा आवडता व ओळखीचा जोडधंदा म्हणजे शेळीपालन होय. या अभियानांच्या माध्यमातून शेळी गटाकरिता 100 शेळ्या व 5 बोकड असा गट तयार करण्याकरिता 20 लाखापर्यंतचा प्रकल्प उभारता येणार आहे. यामध्ये मिळणारे अनुदान व स्वतःचा हिसा वगळता इतर रक्कम उभारण्याकरिता शेतकऱ्यांना कर्ज प्रस्ताव संबंधित बँकेकडे सादर करावा लागेल. सदर अनुदानासाठी शेतकरी पात्र असतील, तर अर्ज करू शकतात.

गुरांसाठी चारा निर्मितीला अनुदान

राष्ट्रीय पशुधन अभियानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विविध शेतीपूरक व्यवसायासाठी अनुदान दिल जाते; परंतु गुरांसाठी चारा निर्मिती करणारा प्रकल्पसुद्धा यामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. पशुधनाला खाण्यासाठी लागणारा चारा, मुरघास व टीएमआर निर्मितीचा प्रकल्प आपल्याला उभारता येतो. त्यासाठी 50 लाखापर्यंतचा प्रकल्प उभारण्याची मान्यता राष्ट्रीय पशुधन अभियानातून देण्यात आलेली आहे. याकरिता 50 टक्के अनुदान व 10 टक्के स्वतःचा हिस्सा भरावा लागणार असून यामध्ये एक गोदाम मशीन व चारा निर्मितीकरिता जमिनीची आवश्यकता भासणार आहे.

वराहपालन अनुदान स्वरूप

सदरच्या अभियानांतर्गत वराह पालनासाठीसुद्धा अनुदान दिलं जातं. रोजगार निर्मिती तसेच उद्योजकता विकास पशुधनाच्या वंशावळमध्ये सुधारणा करून पशुपासूनच्या उत्पादनेत वाढ करणे इत्यादी अपेक्षिता या अभियानातून ठेवण्यात आलेल्या आहेत. म्हणूनच कुक्कुटपालन, शेळीपालन, मेंढीपालन यासह वराहपालनासाठीसुध्दा यामध्ये अनुदान दिलं जातं. यासाठी पशुखाद्य व वैरण उद्योजकता विकास यांनासुद्धा अर्ज करण्याची यामध्ये मुभा देण्यात आलेली आहे.

अर्ज कुठे करावा ?

या अभियानांतर्गत लाभार्थ्यांना अर्ज करण्यासाठी www.udyammitra.gov.in या संकेतस्थळाला किंवा पोर्टलला ऑनलाइन भेट द्यावी लागेल. पोर्टलवरती संपूर्ण अर्जाची प्रक्रिया देण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना याबाबत काही अडचण असल्यास जवळील पशुवैद्यकीय दवाखान्यात संपर्क साधून पशुसंवर्धन विभागाची मदत शेतकरी घेऊ शकतात किंवा अधिकृत वेबसाईटवरील संपर्क क्रमांकावरती संपर्क करून अधिकची माहिती मिळवू शकतात.

👇👇👇👇👇👇👇👇

🔖शेळी-मेंढीपालन योजनेसाठी आता 75 टक्के अनुदान; तब्बल 6 लाख शेतकऱ्यांना मिळणार लाभ

Leave a Comment