Rabbi Pik Vima 2023 : प्रधानमंत्री रब्बी पीक विमा योजना हंगाम 2023 ऑनलाईन अर्ज सुरू, ही आहे शेवटची तारीख ?

Rabbi Pik Vima 2023 : रब्बी हंगामातील पिकांच संरक्षण करण्यासाठी शासनाकडून दरवर्षी प्रधानमंत्री रब्बी पिक विमा योजना राबविण्यात येते. दरवर्षाप्रमाणेच यावर्षीसुद्धा रब्बी पिक विमा योजना लागू करण्यात आलेली असून शेतकऱ्यांनसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. यानुसार कृषिमंत्रालयाकडून रब्बी पिक विमा भरण्याकरिता आवश्यक असलेला PMFBY पोर्टल शुक्रवारपासून म्हणजेच 03 नोव्हेंबर 2023 पासून सुरू करण्यात आलेला आहे.

रब्बी पीक विमा योजना 2023

रब्बी पिक विमा योजनेसाठी कर्जदार आणि बिगर कर्जदार अशा दोन्ही शेतकऱ्यांना विमा भरता येणार आहे. यानुसार पात्र व इच्छुक शेतकऱ्यांना रब्बी ज्वारीसाठी 30 नोव्हेंबरपर्यंत, बागायती गव्हासाठी, मूग व रब्बी कांद्यासाठी 15 डिसेंबरपर्यंत आणि उन्हाळी धानासाठी व उन्हाळी शेंगदाणासाठी 31 मार्च 2024 पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे. म्हणजेच शेतकऱ्यांना त्यांच्या रब्बी पिकाचा पिक विमा भरण्याची शेवटची तारीख वरील विविध पिकांसाठी वेगवेगळी देण्यात आलेली आहे.

राज्य शासनाकडून यंदाच्या खरीप हंगामापासून खरीप व रब्बी या दोन्ही पिकांचा विमा उतरण्यासाठी सर्व समावेशक पिक विमा योजना लागू केलेली आहे. त्यानुसार शेतकऱ्यांना पिक विमा भरत असताना फक्त एक रुपयाचा विमा भरावा लागेल उर्वरित पीक विम्याची रक्कम राज्य शासनाकडून विमा कंपनीला अदा करण्यात येईल. त्यामुळे खरीप पिक विम्याचा भरणा केल्याप्रमाणे शेतकऱ्यांनी रब्बीसाठीसुद्धा असाच प्रतिसाद दाखवावा, असं आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आलं आहे.

इन्शुरन्स कंपनी व जिल्ह्यांचा समावेश

विमा कंपनीसमाविष्ट जिल्हा
आयसीआयसीआय (ICICI) लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी लि.परभणी,वर्धा,नागपूर
ओरीएंटल इन्शुरन्स कंपनी लि.अहमदनगर,सोलापूर,सातारा,जळगाव,नाशिक
युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लि.रत्नागिरी,सिंधुदुर्ग,ठाणे
एचडीएफसी (HDFC) जनरल इन्शुरन्स कंपनी लि.पुणे,धाराशिव,धुळे,हिंगोली,अकोला
युनिव्हर्सल सोम्पो जनरल कंपनी लि.कोल्हापूर,गोंदिया,जालना
भारतीय कृषी वीमा कंपनीसांगली,वाशीम,बीड,बुलढाणा,नंदुरबार,वाशीम
चोलामंडलम एम.एस.जनरल इन्शुरन्स कंपनी लि.रायगड,औरंगाबाद,पालघर,भंडारा
रिलायंस जनरल इन्शुरन्स कंपनी लि.अमरावती,यवतमाळ,गडचिरोली
एसबीआय जनरल इन्शुरन्स कंपनी लि.लातूर जिल्हा

जास्त शुल्क आकारणी झाल्यास खालील ठिकाणी तक्रार करा

या विमा योजनेत सहभागी होण्यासाठी धारकाची नोंदणी करण्यासाठी विमा कंपनीमार्फत सेतू केंद्राकडे किंवा सी.एस.सी. केंद्रावर अर्ज करा. सेतू केंद्र चालकाला प्रती अर्ज 40 rs मिळतात. त्यामुळे शेतकऱ्यांना फक्त एक रुपया भरून या योजनेसाठी नोंदणी करता येणार आहे. मागणी एक रुपयापेक्षा जास्त केल्यास शेतकऱ्यांनी संबंधित पीक विमा कंपनीचे कार्यालय, तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी, जिल्हा कृषी अधिकारी किंवा जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करावी.

📢 1 रुपयात सर्व समावेशक पिक विमा योजना शासन निर्णय (GR)

Leave a Comment