Crop Insurance Date Extended : रब्बी पिक विमा भरण्यासाठी मुदतवाढ; आता ही आहे शेवटची तारीख ?

Crop Insurance Date Extended : सन 2023-24 च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये शेतकऱ्यांना खरीप व रब्बी पिक विमा फक्त एक रुपयात भरता येईल, याची घोषणा करण्यात आलेली होती. सदर योजनेला “सर्व समावेशक पीक योजना” या नावाने राबविण्यात शासनाकडून मान्यता देण्यात आलेली आहे. त्यानुसार चालू वर्षातील रब्बी पिकाचा विमा सुरू झालेला असून शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिसून येत आहे; परंतु मध्यंतरी वेबसाईटच्या तांत्रिक अडचणीमुळे बऱ्याच शेतकऱ्यांना रब्बी ज्वारी पिकाचा विमा भरता आला नाही. त्यामुळे रब्बी पिकाचा विमा भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे.

रब्बी पिक विमा 2023 शेवटची तारीख

खरीप हंगामाप्रमाणे राज्यातील शेतकऱ्यांना रब्बी हंगामात ही 1 रुपयात पिक विमा योजना राबविण्यात येत आहे. रब्बी पिक विमा योजनेमध्ये महाराष्ट्राचा विचार केला तर ज्वारी, गहू, मका, हरभरा या पिकांचा समावेश करण्यात आलेला आहे. पिक विमा योजनेमध्ये कोकणातील आंबा आणि इतर सर्व राज्यातील काजू, संत्रा व रब्बी हंगामातील ज्वारी पिकासाठी विमा उतरवण्याची शेवटची तारीख 30 नंबर 2023 देण्यात आलेली होती.

पिक विमा पोर्टलमधील काही तांत्रिक अडचणीमुळे इच्छुक शेतकऱ्यांना काही पिकाचा विमा उतरवता आला नाही, यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांची शासनाकडे मागणी होती, की रब्बी पिकाचा विमा भरण्यासाठी आम्हाला मुदतवाढ देण्यात यावी. शेतकऱ्यांची ही मागणी लक्षात घेता शासनाकडून पिक विमा भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे. कोणत्या पिकासाठी शेवटची तारीख किती? तुम्ही खालीलप्रमाणे पाहू शकता.

रब्बी Pik Vima मुदतवाढ

रब्बी पिक विमा भरण्यासाठी शासनाकडून शेतकऱ्यांना खालीलप्रमाणे मुदतवाढ देण्यात आलेली आहे.

  • रब्बी ज्वारी : 4 आणि 5 डिसेंबर 2023
  • कोकणातील आंबा : 4 आणि 5 डिसेंबर 2023
  • संत्रा : 4 आणि 5 डिसेंबर 2023
  • काजू : 4 आणि 5 डिसेंबर 2023

वरील सर्व रब्बी पिकासाठी शेतकरी 4 व 5 डिसेंबरपर्यंत विमा उतरवू शकतात. तसेच इतर हरभरा व गहू पिकासाठी ही मुदत 15 डिसेंबर 2023 पर्यंत देण्यात आलेली आहे.

Leave a Comment