Crop Insurance : 1 रुपया भरा आणि सोयाबीनसाठी हेक्टरी 55 हजारांचा विमा मिळवा !

Crop Insurance : नैसर्गिक आपत्ती व इतर कारणामुळे शेतकऱ्यांच्या शेतीपिकांच नुकसान झाल्यास शेतकरी अडचणीत येतात, अशावेळी शेतकऱ्यांना पिकांची नुकसान भरपाई मिळावी, यासाठी केंद्रशासनाकडून “प्रधानमंत्री पिक विमा योजना” सुरू करण्यात आली. यापूर्वीचा जर विचार केला, तर पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना भरावी लागत असत; मात्र यंदा यामध्ये मोठा बदल करून शेतकऱ्यांना दिलासा देण्यात आलेला आहे.

पीक विमा योजना 2023 महाराष्ट्र

यंदा शासनाकडून पिकविमा योजनेमध्ये खूप मोठा बदल करून “सर्वसमावेशक पिक विमा योजना” राबविण्यात येत आहे. या योजनेला एक रुपयांची पिक विमा योजना असं सुद्धा संबोधल जात आहे. सदर योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दरवर्षाप्रमाणे विमा हप्त्याची संपूर्ण रक्कम न भरता; फक्त एक रुपया भरावा लागणार आहे. उर्वरित रक्कम केंद्र व राज्य शासनाच्या एकत्रीकरणातून विमा कंपनी कंपनीला अदा करण्यात येईल.

सध्या शेतकऱ्यांनी खरीप पिकांची पेरणी जोमानं सुरू केली आहे. या पिकाला संरक्षण मिळावं यासाठी राज्यशासनाकडून एक रुपयात पिकविमा योजनासुद्धा सुरू करण्यात आलेली आहे. शेतकऱ्यांच्या पिकाच नुकसान झाल्यास विमा कंपनीकडून ठरविण्यात आलेली संरक्षित रक्कम शेतकऱ्यांना मिळणार असून यासाठी शेतकऱ्यांना एक रुपयात आपल्या पिकाचा विमा वेळीच काढावा लागणार आहे.

या परिस्थितीत नुकसान भरपाई मिळणार

अतिवृष्टी, वादळ, अवेळी पाऊस, सततचा पाऊस, पूर यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे मोठ नुकसान झाल्यास, उतरवण्यात आलेल्या पिक विम्याचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल; कारण अशा परिस्थितीमध्ये शेतकरी आर्थिक अडचणीत येतो व संपूर्णता खचून जातो. त्यामुळे शेतकरी खचून न जाता व आगाऊ रक्कम न देता विमा काढावा; म्हणून एक रुपयात पीकविमा शासनाकडून उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.

कोणत्या पिकाला किती विमा ?

नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या कोणत्या पिकाला किती विमा दिला जातो. ही बाब संपूर्णतः पिकांच्या नुकसान झालेल्या परिस्थितीवर अवलंबून असते, जर शेतकऱ्यांच 100% नुकसान झाला असेल, तर अशा परिस्थितीमध्ये उदाहरणार्थ, सोयाबीन या पिकासाठी हेक्टरी 55 हजारांचा विमा परतावा शेतकऱ्यांना दिला जातो. यासंदर्भातील आधीकच्या माहितीसाठी पीक विमा योजना 2023 चा शासन निर्णय (GR) तुम्ही खालीलप्रमाणे पाहू शकता.

शासन निर्णय (GR)येथे क्लिक करा

Leave a Comment