आँनलाईन अर्ज आणि कागदपत्र : PM Svanidhi Yojana Online Application And Documents

पीएम स्वनिधी योजनाअंतर्गत अर्जदारांना विनाकारण कर्जाची सुविधा मिळवण्यासाठी काही आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी लागेल. आवश्यक कागदपत्र असतील, तर अर्जदारांना खालीलप्रमाणे पीएम स्वनिधी योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर नोंदणी करून सदर योजनेचा लाभ मिळवता येईल.

आवश्यक कागदपत्र (Documents)

  • अर्जदारांचा आधार कार्ड
  • मतदान ओळखपत्र
  • शिधापत्रिका
  • राष्ट्रीयकृत बँक पासबुकची झेरॉक्स
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • रहिवासी पुरावा
  • आधार नोंदणी करत मोबाईल क्रमांक
  • सदर योजनेचा लाभ फक्त छोट्या पथविक्रेत्यांना देण्यात येईल

पीएम स्वनिधी ऑनलाईन अर्ज कसा करावा?

  • सदर विनाकारण कर्ज योजनेचा लाभ घेण्यासाठी पद विक्रेत्यांनी किंवा छोट्या व्यवसायिकांनी शासनाकडून देण्यात आलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी – येथे क्लिक करा
  • अधिकृत वेबसाईटच्या मुख्यपृष्ठावर आल्यानंतर, अर्जाची संपूर्ण प्रक्रिया त्याठिकाणी दाखवण्यात येईल. किंवा स्क्रीनवरील Apply Loan 10k, Apply Loan 20k, Apply Loan 50k या पर्यायावर क्लिक करून तुम्ही पुढील अर्जाची प्रक्रिया पूर्ण करू शकता.
  • त्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल क्रमांक टाकावा लागेल मोबाईलवरती एक 6 अंकी ओटीपी पाठवण्यात येईल.
  • ओटीपी टाकून अर्ज सत्यापित केल्यानंतर तुम्हाला नोंदणी फॉर्म दिसेल, त्याठिकाणी अर्जदाराची संपूर्ण माहिती भरून घ्या.
  • त्यानंतर पुढील टप्प्यात सर्व आवश्यक कागदपत्र स्कॅन करून अपलोड करा.
  • संपूर्ण अर्ज प्रक्रिया भरणा झाल्यानंतर शासनाकडून नियुक्त करण्यात आलेल्या स्वनिधी केंद्राला भेट द्या आणि आवश्यक कागदपत्र व फॉर्म सबमिट करा.
  • फॉर्म सबमिट केल्यानंतर तुमच्या अर्जाची पडताळणी करण्यात येईल पडताळणी केल्यानंतर अर्जदार पात्र असतील, तर कर्जाची रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल.